शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांकडून सुरू झाली निवडणुकीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

नवरात्र व दिवाळीपासूनच इच्छुकांनी आपली तयारी दाखविण्यास सुरूवात केली होती. मात्र, मध्येच जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायतीच्या निवडणुका आल्या व त्या लांबलचक चालल्या. परिणामी नगर परिषदेच्या निवडणुका पुढे सरकत गेल्या. अशात इच्छुकांनी स्वत:ला आवरून घेतले होते. मात्र, आता प्रभाग रचनेचा कार्यक्रम येताच त्यांना निवडणुकीसाठी पुन्हा हुरूप आल्याचे दिसत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायतीच्या निवडणुका आटोपल्या असून, आता पाळी आहे ती नगर परिषद निवडणुकांची. त्यासाठी सध्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आला असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने निवडणूक कार्यक्रम सुरू होणार आहे. अशात आता नगर परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, इच्छुक तयारीला लागल्याचे दिसत आहे. यासाठी होर्डिंगबाजी व कार्यक्रमांचे आयोजन करून ते आपली तयारी दाखवून देत आहेत. ९ फेब्रुवारी रोजी नगर परिषदेचा कार्यकाल संपला असून, सध्या प्रशासक कारभार पाहात आहेत. अशातच आता प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू झाला आहे. म्हणजेच, नगर परिषद निवडणुकीचे कामकाज सुरू झाल्याचे दिसत आहे. यामुळेच  आतापर्यंत शांत असलेल्या इच्छुकांकडूनही तयारी असल्याचे दाखवून दिले जात आहे. यासाठी त्यांनी भेटीगाठी सुरू केल्याचे दिसत आहे. शहरात प्रत्येकच भागात सध्या यातूनच होर्डिंगबाजीसुद्धा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय येणारा प्रत्येकच कार्यक्रम व विशेष दिवसांना टिपून घेत कार्यक्रमांच्या आयोजनावर भर दिला जात आहे. जेणेकरून नागरिकांच्या नजरेत येण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे, नवरात्र व दिवाळीपासूनच इच्छुकांनी आपली तयारी दाखविण्यास सुरूवात केली होती. मात्र, मध्येच जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायतीच्या निवडणुका आल्या व त्या लांबलचक चालल्या. परिणामी नगर परिषदेच्या निवडणुका पुढे सरकत गेल्या. अशात इच्छुकांनी स्वत:ला आवरून घेतले होते. मात्र, आता प्रभाग रचनेचा कार्यक्रम येताच त्यांना निवडणुकीसाठी पुन्हा हुरूप आल्याचे दिसत आहे. 

तिकिटसाठी इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न - निवडणूक लढायची असल्याने आता तिकीट लागणार आहे. करिता आता इच्छुकांकडून येणाऱ्या प्रत्येकच सणवार व दिनविशेष व कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर भर दिला जात आहे. यात स्वत:च्या जन्मदिनापासून थोर व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, सणवारात महाप्रसाद हे सध्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. एवढेच नाही तर सध्या सुरू असलेले रस्ते-नाल्या व भूमिगत गटार योजनेच्या कामाच्या ठिकाणी उभे राहून काही नेतेमंडळीसुद्धा त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

चौकाचौकात वाढली गर्दी - नगर परिषद निवडणूक लढण्यासाठी उतावीळ इच्छुकांकडून सध्या सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत चौकाचौकांत टोळके जमवून जनसंपर्क साधला जात असल्याचे दिसत आहे. कधी कुणासोबत न बोलणारे व चौकात न दिसणारेही आता चौकात टोळक्यांमध्ये उभे असताना दिसत आहेत. यातून ते आपली तयारी दाखवित असले तरीही लोकांना हे चांगल्याने समजून येत आहे.  

 

टॅग्स :Electionनिवडणूक