शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तंमुसच्या सहकार्याने प्रेमीयुगुलाचा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 02:15 IST

गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समजुतीला मान देऊन दोन्ही कुटुंबाने ताणतणाव बाजूला सारून

काचेवानी : गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समजुतीला मान देऊन दोन्ही कुटुंबाने ताणतणाव बाजूला सारून प्रेमीयुगुलास तंटामुक्त समितीच्या सहकार्याने विवाह बंधनात अडकविले. गावातील विठ्ठल रूख्माई व हनुमान मंदिरात संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत सदर लग्न सोहळा पार पडला. काचेवानी (बरबसपुरा) येथील युवराज पटले यांचा मुलगा अजय (२३) व सेजगाव येथील भिकराम पारधी यांची मुलगी सीमा (२१) यांचे मागील साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या प्रकरणाची माहिती दोघांनी आपापल्या कुटुंबास दिली. यानंतर गावातील प्रतिष्ठितांना एक दुसऱ्याच्या घरी नेवून समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाहेरगावावरून अजय आल्यानंतर मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष तथा उपसरपंच पप्पू सय्यद, पोलीस पाटील प्रतिनिधी नरेंद्र रंगारी, शिक्षक नेतराम माने, ग्रा.पं. सदस्य संदीप अंबुले, मुलाचे वडील युवराज पटले, मोठे वडील जगलाल पटले व परिवारासह वधूच्या घरी जावून तेथील मान्यवरांना मुलीच्या वडिलांद्वारे पाचारण करण्यात आले. सेजगाव तंमुसचे अध्यक्ष कन्हैयालाल उचलकर, सचिव अशोक बळगे, पं.स. उपसभापती डॉ. किशोर पारधी, माजी सभापती प्रभूदास सोनेवाने, रामचंद्र पारधी यांच्यासह २० ते २५ नागरिक मुलीच्या वडिलांच्या घरी गेले. घरी सभा घेण्यात आली. दोन्ही पक्षाचे कुटुंब व प्रेमीयुगल अजय व सीमा यांच्याबाबत चर्चा करण्यात आली. काही अडचणी निर्माण होत असताना दोन्ही गावच्या लोकांनी समजूत घातली. दोन्ही पक्षाने स्वीकृती दिली. यानंतर ग्रामस्थांनी व तंमुसने कार्यवाही पार पाडली. त्यानंतर सेजगावटोला येथे हनुमान व विठ्ठल रूख्माई मंदिरात विधिवत लग्न सोहळा पार पडला.