शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमचंद पटले यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 21:46 IST

श्रावणबाळ योजनेंतर्गत सुरु असलेली वृद्धापकाळ पेंशन काही गावकऱ्यांनी तक्रार केल्याने बंद करण्यात आली. त्यामुळे बोदलबोडी येथील प्रेमचंद चंदूलाल पटले यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

ठळक मुद्देश्रावणबाळ योजनेचा लाभ देणार : २८ जूनच्या सभेत प्रकरण करणार मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : श्रावणबाळ योजनेंतर्गत सुरु असलेली वृद्धापकाळ पेंशन काही गावकऱ्यांनी तक्रार केल्याने बंद करण्यात आली. त्यामुळे बोदलबोडी येथील प्रेमचंद चंदूलाल पटले यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. तसेच २१ जूनला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. अखेर स्थानिक प्रशासनाने तडकाफडकी पेंशन मंजूर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पटले यांनी उपोषण मागे घेतले.तालुक्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष इसराज बहेकार यांना पाचारण करुन हा प्रश्न निकाली काढण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. बहेकार यांनी पटले यांचे प्रकरण २८ जूनच्या सभेत मंजूर करण्याचे आश्वासन दिले. गावातील पदाधिकाºयांनी निंबू पाणी पाजून उपोषण सोडायला लावले.बोदलबोडी येथील प्रेमचंद पटले यांचे वय ६५ वर्षे असून त्यांनी वृध्दपकाळ पेंशन योजनेसाठी अर्ज केला होता. तहसील कार्यालयात त्यांचे प्रकरण मंजूर करुन श्रावणबाळ योजनेंतर्गत त्यांना दरमहा ६०० रुपये पेंशन मिळण्यास सुरूवात झाली. मात्र काही महिन्यांनी गावातील ४० ते ५० व्यक्तींनी प्रेमचंद पटले हे नियमबाह्यपणे पेंशन योजनेचा लाभ घेत असल्याची तक्रार तहसील कार्यालयाकडे केली. पटले यांच्या नावावर पाच एकर शेती असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांची पेंशन बंद करण्यात आली होती. परिणामी पटले यांनी पेंशन पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीला घेवून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाºयांना बोलावून यावर गुरूवारी (दि.२०) तोडगा काढण्यात आला.आपल्यावरील आरोप बिनबुडाचे- बहेकारप्रेमचंद पटले यांची पेंशन बंद झाल्यामुळे काही लोकांनी समिती अध्यक्ष इसराम बहेकार यांनी बंद केल्याचा आरोप केला होता. ते सर्व आरोप खोटे असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बहेकार यांनी दिली. आपण बोदलबोडी गावचे रहिवासी असून काही लोकांनी आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. पटले यांची तक्रार गावकऱ्यांनी तहसील कार्यालयात केली होती. त्यानंतर तहसीलदारांनी चौकशी करुन पेंशन बंद केली होती, असे सांगितले.

टॅग्स :government schemeसरकारी योजना