शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल यांचा नामांकन अर्ज दाखल

By admin | Updated: November 2, 2016 00:23 IST

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गोपालदास अग्रवाल यांनी

तिहेरी लढत होणार : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक भंडारा : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गोपालदास अग्रवाल यांनी मंगळवारी (दि.१) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी विधानसभेचे काँग्रेसचे उपनेता आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, डॉ.नितीन राऊत, बंडुभाऊ सावरबांधे, भरत बहेकार, आ.गोपालदास अग्रवाल, आ.सुनिल केदार, माजी आमदार सेवक वाघाये, अ‍ॅड.आनंदराव वंजारी, रामरतन राऊत, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड.के.आर. शेंडे, चंद्रशेखर ठवरे, रजनी नागपुरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रमोद तितिरमारे, प्रदेश सचिव मुजिब पठाण, प्रफुल गुडधे पाटील, डॉ.योगेंद्र भगत, विनोद जैन, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, मधुकर लिचडे, सिमा भुरे, अरविंद कारेमोरे, अमरनाथ रगडे, शिला इटानकर, दीपक नशिने, लाखनीच्या नगराध्यक्ष कल्पना भिवगडे उपस्थित होते.नामांकन दाखल केल्यानंतर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साई मंगल कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे विधानसभेतील उपनेता आमदार वडेट्टीवार यांनी, विधान परिषदेची ही निवडणूक काँग्रेसची ताकद दाखविण्यासाठी सोनेरी संधी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसला नेहमी धोका दिला आहे. एका ठिकाणी राहून शत्रुसारखा व्यवहार केला. त्यामुळे हिशोब चुकता करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले. माजी मंत्री डॉ. राऊत यांनी, या निवडणुकीत जातीचे कार्ड खेळण्यात येत आहे. त्याचे उत्तर हिंमतीने दिले जावू शकते. माजी मंत्री सतिश चतुर्वेदी म्हणाले, भंडारा-गोंदिया विधान परिषदेची ही जागा नेहमी काँग्रेसची राहिली आहे. आता ही जागा परत आपल्याकडे येत आहे. २००४ मध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कशी गेली, हे आजही समजण्यापलिकडे आहे. आ.अग्रवाल म्हणाले, ही निवडणूक भंडारा-ंगोंदिया जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलविणारी राहणार असून या निवडणुकीत सर्वांच्या एकजुटीची आवश्यकता आहे. आ.सुनिल केदार म्हणाले, प्रफुल अग्रवाल यांचा विजय सुनिश्चित आहे. दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मेहनत घेत असल्यामुळे त्याचे चांगले परिणाम लवकरच दिसतील. माजी आमदार सेवक वाघाये म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस हा पक्ष एक असल्याचे या निवडणुकीतून दिसून येईल. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गणविर यांनी मांडले. संचालन महासचिव पी.जी. कटरे व अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार प्रफुल अग्रवाल यांनी मानले.यावेळी डॉ. झामसिंग बघेले, राजेश नंदागवळी, राधेलाल पटले, जहिर अहमद, पृथ्वीपाल सिंग गुलाटी, डॉ.नामदेव किरसान यांच्यासह मोठ्या संख्येत कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.