शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्रामधून मनोऱ्याला वीज पुरवठा

By admin | Updated: September 10, 2015 02:11 IST

भारनियमनातून मुक्ती देण्यासाठी घरगुती वीज ग्राहकांकरिता सिंगल फेज योजना सुरु करण्यात आली.

नियम बसविले धाब्यावर : वीज वितरण कंपनीचा असाही कारभारचुल्हाड (सिहोरा) : भारनियमनातून मुक्ती देण्यासाठी घरगुती वीज ग्राहकांकरिता सिंगल फेज योजना सुरु करण्यात आली. परंतु मोहाडी (खापा) गावात गावकऱ्यांचे हक्काचे सिंगल फेज रोहित्रामधून चक्क मोबाईल मनोऱ्याला वीज पुरवठा देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.परिणामी गावकऱ्यांना अघोषित भारनियमनाचा भार सोसावा लागत आहे. घरगुती वीज ग्राहकांना भारनियमनातून मुक्ती देण्यासाठी सिंगल फेज योजना सिहोरा परिसरातील गावात सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण गावकऱ्यांना सिंगल फेज रोहित्रामधून वीज पुरवठा करण्यात येत आहे. या शिवाय याच गावात असणाऱ्या शेतकऱ्यांचे कृषी पंपाकरिता स्वतंत्र थ्री फेज रोहित्र लावण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पंपाकरिता देण्यात येणारा वीज पुरवठा भारनियमनात आाहे. परंतु सिंगल फेज वीज पुरवठा भारनियमन मुक्त आहे. परंतु मोहाडी (खापा) गावात चित्र उलटे आहे. या गावात अतिरिक्त सिंगल फेज रोहित्र पुरवठा करण्याची मागणी आहे. या गावात वीज ग्राहकांची संख्या अधिक असल्याने पुरेशी वीज नाही. यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. दिवसरात्र कधीही विजेचा लपंडाव सुरु असल्याने गावकरी वैतागले आहे. दरम्यान खासगी कंपनीचे मोबाईल मनोरा गावात कार्यान्वित करण्यात आले आहे. या मनोऱ्याला वीज पुरवठा देताना थ्री फेज रोहित्रची अट आहे. परंतु सिहोरा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे सिंगल फेज रोहित्र मधून वीज पुरवठा मनोऱ्याला दिला आहे.मनोऱ्याला वीज पुरवठा सुरु करण्यात आल्याने गावात पुन्हा विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. मनोऱ्याकरिता थ्री फेज रोहित्र मंजूर करण्यात आहे. एकाच सिंगल फेज रोहित्रामधून गावकरी आणि मनोऱ्याला वीज पुरवठा होत असल्याचे पहिलेच उदाहरण आहे. या परिसरात अन्य मनोऱ्याला थ्री फेज चे रोहित्र देण्यात आले असून मोहाडी (खापा) गावात नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. सिंगल फेज रोहित्र शेतशिवारात असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण गावकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर)एकाच रोहित्रामधून दोन गावांना पुरवठादावेझरी आणि चुल्हरडोह अशी वेगवेगळी दोन गावे असताना एकाच सिंगल फेज रोहित्रामधून या गावांना वीज पुरवठा करण्यात येत आहे. अतिरिक्त विजेचा दाब वाढत असल्याने या रोहित्राचे वायर जळाले आहेत. यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. या गावाच्या शेजारी वाघांचे अस्तित्व असल्याने भीतीमुळे गावकरी सायंकाळी घराबाहेर पडत नाही. स्वतंत्र रोहित्र मंजूर करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.ग्रीपविना जीवघेणे रोहित्रसिहोरा परिसरात बोटावर मोजण्याइतपत रोहित्रांना ग्रीप आहेत. शेतकऱ्यांना थ्री फेज वीज पुरवठा करणाऱ्या एकाकी रोहित्रांना ग्रीप नाहीत. सिंगल फेज रोहित्रांची हीच अवस्था आहे. थेट विद्युत तारांची जोडणी करण्यात येत आहे. असे करताना दस्ताने उपलब्ध राहत नाही. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या उलट तक्रारी असताना साहित्य उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.