शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

दीपावलीचा पर्व तेजोमय करणारा कुंभार समाज मात्र उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 06:00 IST

सध्या चिनीमाती व प्लास्टर ऑफ पेरीस पासून तयार आकर्षक व कलाकुसरी असलेल्या पणत्या, धुपजाळी, मापुले याकडे ग्राहक आकर्षक होत आहेत. त्यामुळे कुंभाराने चाकावर तयार केलेल्या पारंपारिक मातीच्या पणत्या, मापुले व धुपजाळ्याकडे ग्राहकांची पाठ फिरवत चालले आहेत.

ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञान भोवले : शासकीय मदतीची कारागिरांची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : लक्ष्मीपुजनासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या पणत्या व मापुले घडविणाºया, दिवाळीला प्रकाशमय बनवून उजळून टाकणाऱ्या कुंभार समाजाचे भविष्य मात्र अंधकारमय आहे. बाजारात, शहरातील चौकाचौकात इंग्रजी माती व प्लास्टर आॅफ पेरीस, चिनी बनावटीच्या पणत्यांची दुकाने थाटल्यामुळे ग्राहक पारंपारिक मातीच्या पणत्याकडे पाठ फिरवित आहेत. त्यामुळे कुंभाराने बनविलेल्या मातीच्या पणत्यांची मागणी घटली आहे. आधुनिक युगातील लघु उद्योग व पारंपारिक व्यवसायाला उभारी देण्यासाठी शासनस्तरावर साधन उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे कुंभार समाजातील युवा व्यवसायी लोकेश पात्रे यांनी सांगीतले.सध्या चिनीमाती व प्लास्टर ऑफ पेरीस पासून तयार आकर्षक व कलाकुसरी असलेल्या पणत्या, धुपजाळी, मापुले याकडे ग्राहक आकर्षक होत आहेत. त्यामुळे कुंभाराने चाकावर तयार केलेल्या पारंपारिक मातीच्या पणत्या, मापुले व धुपजाळ्याकडे ग्राहकांची पाठ फिरवत चालले आहेत. त्यामुळे याचा परिणाम कुंभाराच्या व्यवसायावर झाला असून डबघाईस आल्याने उतरती कळा लागली आहे.लाकडी चाकावर पणत्या, मापुले, धुपजाळ्या, भगुले, मातीचे माठ तयार करुन लाकडाच्या भट्टीत भाजली जातात. गेरुच्या पाण्यात बुडवून त्याला रंग दिला जातो. या सगळ्या प्रक्रीयेतून मोठ्या कष्टाने तयार केलेल्या पारंपारिक वस्तुंकडे ग्राहकांनी मात्र आता पाठ फिरविली आहे.आधुनिक काळात स्पर्धेत टिकण्यासाठी मातीची उपलब्धता, विजेवर चालणारी चाके, माती मळणी यंत्र यासारखी अत्याधुनिक साधने शासनाकडून या कारागिरांना पोहोचविणे गरजेचे आहे.राज्यातील काही जिल्ह्यात अशी आधुनिक साधने दिली गेलीत. मात्र गोंदिया जिल्ह्यातील कुंभार कारागिरांना मिळाली नाही. अत्याधुनिक साधने, वित्तपुरवठा, कर्ज, शासकीय मदत व प्रशिक्षण या गोष्टींपासून येथील कुंभार वंचित आहेत.सर्वांची दिवाळी तेजोमय करणारा कुंभार समाज मात्र उपेक्षीतच राहीला. उतरती कळा लागलेल्या या कुंभार व्यवसायाला उभारी देण्यासाठी शासनाने सर्वोपरी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा कुंभार समाजबांधवांनी केली आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी