शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राखीसाठी पोस्टाचे खास ‘वॉटरप्रुफ लिफाफे’

By admin | Updated: August 12, 2016 01:26 IST

राखीच्या रूपातील बहिणीच्या प्रेमाला सुरक्षितपणे भाऊरायापर्यंत पोहचवून देण्याची जबाबदारी स्वीकारत टपाल विभागाने राखीसाठी खास ‘एनव्हलप’ आणले आहेत.

टपाल विभागाची भेट : प्रेम व आपुलकीची भेट राहणार सुरक्षित कपिल केकत गोंदिया राखीच्या रूपातील बहिणीच्या प्रेमाला सुरक्षितपणे भाऊरायापर्यंत पोहचवून देण्याची जबाबदारी स्वीकारत टपाल विभागाने राखीसाठी खास ‘एनव्हलप’ आणले आहेत. पिवळा व गुलाबी या दोन रंगांतील हे लिफाफे वॉटरप्रूफ असून प्रत्येकी सात रूपये दराने टपाल कार्यालयात उपलब्ध आहेत. भाऊ-बहिणीच्या प्रेमाला घट्ट करणारा राखीचा सण आता काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे बाजारपेठ राख्यांच्या दुकानांनी सजली असून त्यात विविध प्रकारच्या राख्या दिसून येत आहेत. राखी खरेदीसाठी आता या दुकानांत गर्दी दिसून येत आहे. सुरक्षेचे वचन देणाऱ्या भावाच्या हाताला राखी बांधून बहीण आपली माया प्रकट करते. रेशमाचा साधा दोरा यासाठी पूरेसा असला तरिही काळानुसार राखीच्या प्रकारांत बदल होत गेला आहे. पैशांकडे न बघता बहिणी आपल्या भावासाठी चांगल्यात चांगली राखी खरेदी करतात. यामुळेच राख्यांचे निर्मातेही दरवर्षी वेगवेगळ््या प्रकारच्या राख्या बाजारात मांडतात. विशेष म्हणजे बहिणीची ही माया तिच्या भावापर्यंत सुरक्षीत पोहचावी यासाठी टपाल विभागाकडून राखीनिमित्त विशिष्ट ‘एनव्हलप’ विक्रीसाठी उपलब्ध केले जातात. यंदाही हे लिफाफे टपाल विभागाने विक्रीसाठी आणले आहेत. पिवळा व गुलाबी या दोन रंगात हे लिफाफे येथील टपालघरात उपलब्ध असून प्रत्येकी सात रूपये दराने विक्री केले जात आहेत. वॉटरपू्रफ असलेले लिफाफे आकर्षक असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. डायमंड वर्कचे अधिक आकर्षण राखी म्हणजे रेशमाची साधी डोरही तेवढीच महत्व ठेवते. मात्र आता भावाला राखी बांधणेही फॅशनेबल झाले आहे. बहिणींची ही पसंती बघता आता राख्यांमध्येही आर्टीफिशीयल डायमंड वर्क दिसून येत आहे. हातात बांधण्यात येत असलेल्या ब्रेसलेट सारख्या राख्या आता बाजारात उपलब्ध होत आहेत. रंगबिरंगी डायमंड लावलेल्या राख्या अधिक आकर्षक दिसत असल्याने त्यांची जास्त डिमांड दिसून येत आहे. शिवाय या राख्या आकर्षक पॅकींगमध्ये येत आहेत. त्यामुळे या राख्यांना बघताच समोरची व्यक्ती आकर्षीत होते. पोस्टावर कुरीअर भारी पोस्टाद्वारे आपले पत्र असो वा राखीचा लिफाफा, कधी समोरच्या व्यक्तीला मिळणार याचा नेम नसतो. राखीसाठीच्या या लिफाफ्याबाबतही तसेच काही आहे. सात रूपयांचा हा लिफाफा खरेदी केल्यावर त्यावर वजनानुसार स्टॅम्प लावावे लागणार आहे. मात्र तो लिफाफा समोरच्या व्यक्तीला कधी मिळणार याची खात्री नाही. तर कु रीअर मध्ये ही भानगड नसून अंतरानुसार ते चार्ज करून दोन-तीन दिवसांत ते हमखास दिलेल्या पत्यावर पोहचणार असल्याची खात्री नसल्याने सध्या कुरीअर सेवेला नागरिक प्राधान्य देत आहेत. छोटा भीम व डोरेमोनचीही धूम सध्या चिमुकल्यांना छोटा भीम व डोरेमोन या कार्टूनचे फॅड लागले आहे. त्यामुळे त्यांना शैक्षणिक साहीत्यांपासून ते कापडांपर्यंत सर्वच वस्तूंवर हे कार्टून्स हवे आहेत. आता राखीच्या बाबतीतही हाच प्रकार दिसून येत आहे. चिमुकल्यांची ही पसंती लक्षात घेता बाजारात छोटा भीम, डोरेमोन, बाल हनुमान, एंग्री बर्डच्या राख्यांची धूम दिसून येत आहे.