शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १ टक्क्यापेक्षाही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि.१७) एकूण ३,३१४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात १,१५४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,१६० ...

गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि.१७) एकूण ३,३१४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात १,१५४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,१६० रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.९ टक्के आहे. मागील आठवडाभरापासून कोरोना बाधितांचा ग्राफ सातत्याने डाऊन होत असल्याने, कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १ टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरली आहे. तर बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १०१ वर आली आहे. यापैकी ६३ रुग्ण गृहविलगीकरणात असून, उर्वरित रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्यानेच जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्वच व्यवहार आता सुरळीत झाले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी जिल्ह्यात ५ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ३ नवीन रुग्णांची नोंद झाली. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,८४,०१८ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,५८,६९४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,९४,११९ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,७३,१९० नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,०६१ कोरोना बाधित आढळले असून, यापैकी ४०,२६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १०१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, २९९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.

..............

आतापर्यंत ३ लाख ७८ हजार नमुन्यांची चाचणी

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ७८ हजार १९७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यात १,८४,०१८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर, १,९४,११९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे. यात एकूण ४१,०६१ कोरोना बाधित आढळले.

..............

३ लाख २७ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोनाला प्रतिबंध लावण्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर शासनाने भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३ लाख २७ हजार ७१९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात २ लाख ४८ हजार ७८४ नागरिकांना पहिला तर ७८ हजार ९३५ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.