शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या काळात घटला रुग्णांचा पॉझिटिव्ही रेट ! १२ हजार बाधितांनी केली मात, संसर्ग येताेय आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत वाढ झाली कारण संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर अनेकजण चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करत होते तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदीसह अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव रोखण्यास मदत झाली तसेच गावात सॅनिटायझरची फवारणी व जनजागृतीवर भर देण्यात आला होता.

ठळक मुद्दे११६०३ बाधितांची नोंद : २९४ रुग्णांचा मृत्यू : ॲक्टिव्ह रुग्णांची संख्येत घट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला प्रतिबंध लावण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कडक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले. याअंतर्गत सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन करण्यात आले. कडक निर्बंध आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असल्याने गर्दी कमी करण्यास मदत झाली. त्यामुळे कोरोनाची साखळीसुद्धा खंडित करण्यास मदत झाली. राज्यातील १२ जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णसंख्येत प्रचंड घट झाली असून त्यात गोंदिया जिल्ह्याचासुद्धा समावेश आहे. १५ ते ३० एप्रिलच्या दरम्यान जिल्ह्यात ११६०३ बाधितांची नोंद झाली तर त्यापेक्षा अधिक म्हणजे १२०४६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे तर २९४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटसुद्धा वाढल्याचे चित्र आहे. एकंदरीत संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा झाला. तसेच जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मोठी मदत झाली. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.  

या तीन कारणांमुळे घटली रुग्णसंख्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे कोरोना साखळी करण्यास मदत झाली. गर्दी कमी करण्यात यश आल्याने संसर्गाचे प्रमाण घटले. कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी जनजागृती आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देण्यात आला. याची सुध्दा मदत झाली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे वेळीच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केल्याने रुग्णवाढीला ब्रेक लावण्यास मदत झाली आहे. 

ग्रामीण भागात रुग्ण वाढले ?कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत वाढ झाली कारण संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर अनेकजण चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करत होते तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदीसह अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव रोखण्यास मदत झाली तसेच गावात सॅनिटायझरची फवारणी व जनजागृतीवर भर देण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण भागात रुग्ण वाढले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या