शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या काळात घटला रुग्णांचा पॉझिटिव्ही रेट ! १२ हजार बाधितांनी केली मात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:48 IST

गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला प्रतिबंध लावण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कडक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत ...

गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला प्रतिबंध लावण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कडक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले. याअंतर्गत सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन करण्यात आले. कडक निर्बंध आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असल्याने गर्दी कमी करण्यास मदत झाली. त्यामुळे कोरोनाची साखळीसुद्धा खंडित करण्यास मदत झाली. राज्यातील १२ जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णसंख्येत प्रचंड घट झाली असून त्यात गोंदिया जिल्ह्याचासुद्धा समावेश आहे. १५ ते ३० एप्रिलच्या दरम्यान जिल्ह्यात ११६०३ बाधितांची नोंद झाली तर त्यापेक्षा अधिक म्हणजे १२०४६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे तर २९४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटसुद्धा वाढल्याचे चित्र आहे. एकंदरीत संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा झाला. तसेच जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मोठी मदत झाली. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

......

३१ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत झालेल्या टेस्टिंग : ३५८३२

पॉझिटिव्हीटी रेट : ७.५

कोरोनामुक्तीचा दर : ८.९

१५ एप्रिल ते १ मे दरम्यान झालेल्या टेस्टिंग : ३६४५०

पॉझिटिव्हीटी रेट : १०.५

कोरोनामुक्तीचा दर : १०.७

.......

या तीन कारणांमुळे घटली रुग्णसंख्या

- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे कोरोना साखळी करण्यास मदत झाली. गर्दी कमी करण्यात यश आल्याने संसर्गाचे प्रमाण घटले.

- कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी जनजागृती आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देण्यात आला. याची सुध्दा मदत झाली.

- कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे वेळीच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केल्याने रुग्णवाढीला ब्रेक लावण्यास मदत झाली आहे.

............

ग्रामीण भागात रुग्ण वाढले ?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत वाढ झाली कारण संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर अनेकजण चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करत होते तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदीसह अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव रोखण्यास मदत झाली तसेच गावात सॅनिटायझरची फवारणी व जनजागृतीवर भर देण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण भागात रुग्ण वाढले आहेत.

............