शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक पत्रकारितेतून सामान्यांना न्याय मिळतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:31 IST

पत्रकार शासन व जनतेचा दुवा आहे. सत्यता बाळगुण गरीब व गरजुंना न्याय मिळवून देणे तसेच शासकीय योजना घराघरात पोहोचविण्याचे कार्य पत्रकारांमुळे शक्य झाले आहे. प्रिंट मिडियाचे महत्व आजअमर आहे. त्यात सकारात्मक पत्रकारीतेतून सामान्यांना न्याय मिळतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड यांनी केले.

ठळक मुद्देरवींद्र राठोड : पत्रकार दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : पत्रकार शासन व जनतेचा दुवा आहे. सत्यता बाळगुण गरीब व गरजुंना न्याय मिळवून देणे तसेच शासकीय योजना घराघरात पोहोचविण्याचे कार्य पत्रकारांमुळे शक्य झाले आहे. प्रिंट मिडियाचे महत्व आजअमर आहे. त्यात सकारात्मक पत्रकारीतेतून सामान्यांना न्याय मिळतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड यांनी केले.तालुका पत्रकार संघाच्यावतीने लक्ष्मणराव मानकर इन्स्टीट्यूट आॅफ फार्मसी येथे रविवारी (दि.६) पत्रकार दिवसानिमित्त आयोजीत कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार जगदीश शर्मा होते. उद्घाटन संपादक एच.एच. पारधी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार शिशुपाल पवार, प्राचार्य डॉ. डी.के. संघी, तालुका कृषी अधिकारी लाखन बंसोड, समाज सेविका कविता रहांगडाले, पत्रकार संघाचे अध्यक्ष इसुलाल भालेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुन बालशास्त्री जांभेकर, लक्ष्मणराव मानकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.याप्रसंगी डॉ. संघी यांनी, पत्रकारांनी एक छत्री व्यासपीठावर येवून अनेक गरजुंच्या समस्यांचे निवारण करावे. लेखणीतून सरकार बदलते म्हणून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी असे मत व्यक्त केले.पारधी यांनी, पत्रकार समाजाचा आरसा आहे. आज आणि काल यातील पत्रकारीतेत आवाहने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत सत्याचे खंजर उचलून शोशितांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. पवार यांनी, ग्रामीण पत्रकार परीसरातील समस्या मंत्रालयात पोहोचविण्याचे कार्य करतो.वेळोवेळी शासन योजनांचा लाभ गोरगरीबांना मिळाला की नाही याचा पाठपुरावा करतो. म्हणूनच पत्रकार व प्रशासनाचे बंधुभावाचे संबंध आहेत, असे मत व्यक्त केले. तर शर्मा यांनी, सामान्य माणसांच्या प्रश्नांचा आवाज उठवणारे व्यासपिठ असायला हवे. विश्वासार्हता आपल्या हातात आहे ती गमावू नये, असे मत व्यक्त केले.प्रास्ताविक भालेकर यांनी मांडले. संचालन प्रा. झेड.एस. बोरकर यांनी केले. आभार राजीव फुंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुनील क्षिरसागर, सुनील पडोळे, यशवंत मानकर, आनंद शर्मा, विकास शर्मा, पालकराम वालदे, रितेश अग्रवाल, नरेंद्र कावळे, मेहश मेश्राम, दिनेश शेंडे, अजय खेतान, रेखलाल टेंभरे, राधाकिसन चुटे, प्रा. डी.एस. टेंभुर्णे, मुरलीधर करंडे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे संतोष कटकवार, तुलाराम कावळे, रिनाईत, संतोष (लल्लू) गुप्ता, रंजित मेश्राम, गोलू अग्रवाल आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Journalistपत्रकार