शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीओएस अंमलबजावणी जिल्हा राज्यात सलग अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:44 IST

स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी व एकही पात्र शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी एप्रिल २०१७ पासून पार्इंट आॅफ सेलद्वारे (पीओएस) स्वस्त धान्याचे वितरण सुरू करण्यात आले.

ठळक मुद्दे९९८ स्वस्त धान्य दुकांनाना पीओएस मशीन : शंभर टक्के आधार लिंकींग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी व एकही पात्र शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी एप्रिल २०१७ पासून पार्इंट आॅफ सेलद्वारे (पीओएस) स्वस्त धान्याचे वितरण सुरू करण्यात आले.आदिवासी बहुल व दुर्गम समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याने या प्रणालीचे शंभर टक्के अंमलबजावणी करुन सलग पाचव्या महिन्यात राज्यात अव्वल स्थान कायम ठेवले आहे. जिल्ह्यात एकूण ९९८ स्वस्त धान्य दुकानदार असून ७७ हजार १८१ अंत्योदय शिधापत्रिकाधारक, ९० हजार केसरी शिधापत्रिकाधारक व ६ लाख ६४ हजार प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक आहे.या शिधापत्रिकाधारकांना शासनाने ठरवून दिल्यानुसार दर महिन्याला स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. मात्र बºयाच गावांमध्ये स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या व स्वस्त धान्य दुकानदारांबाबत शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी होत्या. शिवाय स्वस्त धान्य दुकानातील अन्न धान्याचा काळाबाजार केला जात होता.यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने सर्व शिधापत्रिकाधारकांना आधारलिंक केले. त्यानंतर यात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी पीओएस प्रणालीव्दारे स्वस्त धान्याचे शिधापत्रिकाधारकांना वितरण सुरू केले.यासाठी जिल्ह्यातील सर्व ९९८ शिधापत्रिकाधारकांना पीओएस मशिनचे वाटप केले. या मशिनला थेट जिल्हा पुरवठा विभागाशी कनेक्ट केले. दरम्यान सालेकसा, देवरी तालुक्यातील काही गावांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे सुरूवातीला अडचण निर्माण झाली होती. ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही त्या ठिकाणी त्यांनी आॅफलाईन वितरण व्यवस्था सुरू केली.यामुळे पीओएस प्रणालीव्दारे स्वस्त धान्याचे वितरण करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला यश आले. त्यामुळे मागील पाच महिन्यापासून गोंदिया जिल्हा पीओएस प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात शंभर टक्के अव्वल ठरला आहे.विशेष म्हणजे मागील पाच महिन्यापासून पीओएस प्रणालीव्दारे स्वस्त धान्याचे वितरण करण्यात गोंदिया जिल्ह्याची घौडदोड कायम आहे.मे महिन्यात ८६ टक्के, जून ८९ टक्के, जुलै ९१ टक्के, आॅगस्ट ९२ टक्के, आॅक्टोबर ९२ आणि नोव्हेबंर महिन्यात ९४ टक्के स्वस्त धान्याचे वितरण पीओएस प्रणालीव्दारे करुन जिल्ह्याने राज्यात अवल्ल स्थान कायम ठेवल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई यांनी सांगितले.पोर्टेब्लिटीची सुविधाशिधापत्रिका आधारलिंक व पीओएस प्रणालीशी सलग्न करण्यात आल्याने शिधापत्रिकाधारकांना कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्याची उचल करण्यास मदत झाली. दरम्यान या पोर्टेब्लिटीची सुविधेचा आत्तापर्यंत जिल्ह्यातील १८५१ शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतला. शिवाय यामुळे स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी सुद्धा दूर झाल्या.शिधापत्रिकाधारकांना मिळणारतूरडाळ, साखर दिवाळीनिमित्त प्राधान्य गटातील आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने प्रती कार्ड १ किलो साखर, १ किलो तुरडाळ, १किलो चनाडाळ आणि १ किलो उडीद वाटप करण्याचा निर्णय घेतला यासाठी जिल्ह्याला १५०० क्विंटल तूरडाळ व चणाडाळीचा साठा मंजूर करण्यात आला आहे. लवकरच याचे स्वस्त धान्य दुकानातून वाटप केले जाणार आहे.७७ गावे इंटरनेटपासून वंचितजिल्ह्यातील ७७ गावांमध्ये अद्यापही इंटरनेटची सुविधा नसल्याने या गावात पीओएस प्रणालीची अंमलबजावणी करण्यास अडचण निर्माण झाली. मात्र यानंतरही जिल्हा पुरवठा विभागाने यावर मात करीत जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीओएस प्रणालीची ९४ टक्के अंमलबजावणी करुन शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य उपलब्ध करुन दिले.

टॅग्स :government schemeसरकारी योजना