शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतच्या निकृष्ट बांधकामाची पोल-खोल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

देवरी : देवरी नगरपंचायतने शहरातील मस्कऱ्या चौक ते बौद्ध विहार पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्त्याचे बांधकाम करीत दोन्ही बाजूला ...

देवरी : देवरी नगरपंचायतने शहरातील मस्कऱ्या चौक ते बौद्ध विहार पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्त्याचे बांधकाम करीत दोन्ही बाजूला गट्टू बसविले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ट्रकचे चाक या गट्टूंमध्ये खड्डा पडून अडकले. यावरून या कामावर प्रश्न चिन्ह लागले असून या कामाची चौकशी करून कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

देवरी नगरपंचायत झाल्यापासून शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये शासनाकडून प्राप्त होत आहेत. अशात शहरातील जनतेला दर्जेदार रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते, नाली व गट्टू कामे केली जात आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक-१० मध्ये राहत असलेल्या वासनीक यांच्या बाजूला लागून असलेल्या भागातील काम करण्यात आले आहे. मात्र मागील वर्षी केलेले गट्टूचे बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून या रस्त्याने जात असलेल्या ट्रकचे चाक रस्त्यात खचले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी या निकृष्ट कामाची पोल-खोल झाली आहे. कंत्राटदाराने काम सुरू करण्यापूर्वी जमीन सपाट करुन रोडरोलरने दबाई न करताच तुरळकपणे दगड टाकून रेती भरली व पाणी सुद्धा निट टाकले नव्हते. घाईगडबडीत सिमेंट काँक्रीट टाकून रस्तावर गट्टु बसविले त्यात योग्य त्या साहित्याचा वापर केला गेला नाही. परिणामी ट्रकचे अख्खे चाकच त्या रस्त्यात खचले. परिसरातील नागरिकांनी विभागीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच कामावर झालेला खर्च दोषी कडून वसुल करुन रस्ता पुन्हा अंदाजपत्रकानुसार बांधून द्यावा अन्यथा नगरपंचायत समोर जनआंदोलन करण्यात येईल असा ईशारा नागरिकांनी दिला आहे.

----------------------------

अंदाजपत्रकाला बगल देऊन निकृष्ट कामे

नगरपंचायतमधील घरकुल निधी, घन व्यवस्थापन व निविदा प्रकरण जनतेत चर्चेत असून या प्रकाराने त्यात भर पडली असून नगरपंचायतच्या बांधकाम समिती, स्वच्छता व आरोग्य समिती, पाणी पुरवठा समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे. नगरपंचायतने शहरात कोट्यवधींच्या घरात रस्ते व नालीची कामे केली असुन त्यांची सुद्धा चौकशी केल्यास त्यातील अनेक कामे अंदाजपत्रकाला बगल देऊन केलेली तसेच निकृष्ट दर्जाची आढळून येतील. कमिशनखोरीमुळे या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे.