शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आलेझरी-बालापूर ते सुकडी-डाकराम रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

आदिवासीबहुल क्षेत्र व नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त क्षेत्र ओळखला जाणारा आलेझरी-बालापूर ते सुकडी-डाकराम हा मुख्य रस्ता संपूर्ण उखडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तिरोडाअंतर्गत या रस्त्याचे मागे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याचे खडीकरण, रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. पण संबंधित विभागाचे अभियंते व कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघातांत वाढ

लाेकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : आदिवासी व नक्षलग्रस्त जंगलव्याप्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलेझरी बालापूर ते सुकडी-डाकराम रस्त्याची फारच दुरवस्था झाली आहे. या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती करुन डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आदिवासीबहुल क्षेत्र व नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त क्षेत्र ओळखला जाणारा आलेझरी-बालापूर ते सुकडी-डाकराम हा मुख्य रस्ता संपूर्ण उखडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तिरोडाअंतर्गत या रस्त्याचे मागे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याचे खडीकरण, रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. पण संबंधित विभागाचे अभियंते व कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच या रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. एका वर्षामध्ये या रस्त्यांची संपूर्ण गिट्टी उखडलली होती. संबंधित गावकऱ्यांनी अनेकदा याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली; पण त्या तक्रारीचा कोणताच फायदा झाला नाही. ज्यावेळी रस्त्याचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराने गावातील एक-दोन व्यक्तींना हाताशी धरून रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे निकृष्ट दर्जाचे केली. त्यामुळे आजही या रस्त्यांची परिस्थिती एवढी दयनीय झाली की संपूर्ण गिट्टी उखडलेली आहे. या रस्त्याने चालता व सायकलही चालविता येत नाही. सुकडी-डाकराम हा मुख्य गाव असल्याने आलेझरी-बालापूर येथील दुर्लक्षित धोरणामुळे आज आदिवासी गाव विकासापासून कोसो दूर आहे. आठ दिवसांत या रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरू झाले नाही  तर जि.प. व पं.स.निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग