शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पूल झाले जीर्ण

By admin | Updated: June 17, 2015 01:42 IST

येथून ८ किमी अंतरावर असलेल्या ग्राम हेटी (गिरोला) येथे मालगुजारी तलाव असून या तलावामुळे जवळपास १०० एकर

तीन वर्षांपासून दुर्लक्ष : पाण्याच्या प्रवाहामुळे पडले भगदाडसौंदड : येथून ८ किमी अंतरावर असलेल्या ग्राम हेटी (गिरोला) येथे मालगुजारी तलाव असून या तलावामुळे जवळपास १०० एकर शेती ओलिताखाली येते. तसेच वाल्मिक मच्छिमार सह संस्था म. गिरोला या संस्थेचे १२५ सभासद या तलावावर मासेमारी करुन आपला उदरनिर्वाह चालवितात. हेटी येथील शेतातून मुरदोलीच्या कालव्यातून येथे पाणी येते. कालव्यावरील पूल ४४ वर्ष जुना असून जीर्ण झाला आहे. शिवाय पुलावर मोठे भगदाड पडले असून संबंधितांचे दुर्लक्ष आहे.सदर तलावावर पाटबंधारे विभाग गोंदिया यांची देखरेख असून त्यावर शाखा अभियंता सौंदड यांचे नियंत्रण आहे. या तलावात येणारा पाण्याचा प्रवाह हेटी येथील शेतकऱ्यांच्या शेतात मुरदोलीवरुन येणाऱ्या कालव्यावरुन येत असतो. हा लोंढा येण्यासाठी कालव्यावर एक छोटेखानी पूल बांधण्यात आला आहे. परंतु या पुलाचे बांधकाम जवळपास ४४ वर्षे अगोदरचे असल्याने जीर्णावस्थेत आहे. त्यामुळे पुलाच्या वरच्या भागाला पाण्याच्या प्रवाहामुळे फार मोठे भगदाड पडले आहे. यावर्षी तलावात येणारे पाणी या भगदाडावाटे कालव्यात जाईल व कालव्यावाटे तो इतरत्र जाईल. त्यामुळे तलावात पाण्याचा साठा होणार नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.या समस्येकडे मागील तीन वर्षांपासून या क्षेत्रातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व आमदार आदी पदाधिकाऱ्यांनी अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची भविष्यात गंभीर समस्या निर्माण होईल. तसेच मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या रोजगार व उदरनिर्वाहाची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या तलावाचे गिरोला बाजूकडील तुडूम लिकेज असल्यामुळे तलावातील पाणी बेवारस वाहून जाते. तरी या गंभीर बाबीकडे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग नवेगावबांध यांनी जातीने लक्ष घालून यथाशीघ्र या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष तुळशीराम वलथरे व ईतर शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)अपघाताची शक्यता४पुलाच्या वरच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडल्याने ये-जा करताना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ४४ वर्षे जुन्या या पुलाची साधी डागडुजीसुद्धा करण्यात आली नाही. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे एखादा शेतकरी पुलावरील भगदाडात अडकण्याचीच अधिक शक्यता आहे. सदर पुलाचे नूतनीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.