शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
3
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
5
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
6
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
7
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
8
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
9
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
10
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
11
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
12
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
13
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
14
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
15
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
16
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
17
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
18
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
19
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
20
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

३४१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:16 PM

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकाण तापले होते. त्यानंतर सोमवारी (दि.१६) जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.

ठळक मुद्देउमेदवारांसाठी कत्तल की रात : निवडणूक प्रशासन सज्ज, चोख बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकाण तापले होते. त्यानंतर सोमवारी (दि.१६) जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.नक्षलप्रभावीत भागात सकाळी ७ ते दुपारी ३ या कालावधीत तर इतर भागात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदान होणार आहे.जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला होता. मात्र यापैकी तीन ग्रामपंचायतची निवडणूक काही नागरिकांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक विभागाने ती रद्द केली. तर चार ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध पार पडली. त्यामुळे सोमवारी (दि.१६) ३४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. ३४७ सरपंचपदांसाठी एकूण १ हजार ५१ उमेदवार तर ३ हजार २३ सदस्य पदांसाठी ५ हजार ८१८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी ८ सरपंच व ३१३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित पदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे.यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड थेट जनतेतून केली जाणार असल्याने या पदासाठी चांगलीच चूरस पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी आहे. याच निवडणुकीवर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीचे भविष्य अवंलबून असते. त्यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. मागील दहा दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी ग्रामीण भागात तळ ठोकून आहेत. शनिवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी रॅली काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिल्याचे चित्र होते.दरम्यान सरपंच आणि सदस्यपदांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक विभागातर्फे मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या आहे. पोलीस प्रशासनाने संवेदनशिल आणि नक्षलप्रभावीत भागातील मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावला आहे.भेटीगाठी आणि आश्वासने३४१ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. त्यासाठी रविवारी (दि.१५) सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर आणि त्यांचे मन वळविण्यावर भर दिला. मतदारांना खूश करण्यासाठी सर्वच क्लृप्त्यांचा वापर उमेदवारांकडून केला जात होता. सोमवारी मतदान होणार असल्याने मते मिळावी, यासाठी उमेदवारांचे अखेरपर्यंत प्रयत्न सुरू होते. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी रविवारची रात्र कत्तल की रात होती.एकूणच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.संवेदनशील मतदान केंद्रांवर नजरनिवडणूक विभागाने जिल्ह्यातील ८० वर मतदान केंद्र संवेदनशिल जाहीर केले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही गोंधळ उडू नये, यासाठी निवडणूक आणि पोलिस प्रशासनातर्फे या केंद्रावर करडी नजर ठेवली जात आहे. यासाठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.