शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३४ बुथवरील मतदान ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 16:06 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदानासाठी गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३४५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात ईव्हीएम बंद पडल्यामुळे ३४ बुथवरील मतदान प्रक्रिया बंद असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी सोमवारीे (दि.२८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

ठळक मुद्देउपविभागीय वालस्कर यांची माहिती१४१ बुथवरील मशीनमध्ये बिघाड 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदानासाठी गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३४५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. मात्र यापैकी ७५ बुथवरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनबंद असल्याच्या १४१ तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅटमध्ये बिघाड आला. काही ठिकाणच्या ईव्हीएम मशीन बदलविण्यात आल्या. परंतु मोठ्या प्रमाणात ईव्हीएम बंद पडल्यामुळे ३४ बुथवरील मतदान प्रक्रिया बंद असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी सोमवारीे (दि.२८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गोंदिया विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी ३४५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. या बुथवर ३७९ ईव्हीएम मशीन व ४१४ व्हीव्हीटीपॅट मशिन देण्यात आले होते. सोमवारी सकाळपासूनच मतदान केंद्रावरून ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅटमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. परंतु ज्या ठिकाणच्या तक्रारी आल्या त्या ठिकाणी तांत्रीक अधिकारी जाऊन त्यांनी बिघाड दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु निवडणूक विभागाच्या निदेर्शानुसार ज्या ठिकाणी एकदा मतदान सुरू झाले. तसेच मध्येच बिघाड झाला तर ईव्हीएम मशीन किंवा व्हीव्हीटीपॅट दुरूस्त न करता संपूर्ण सेटच नवीन लावण्याचे निर्देश दिले. परंतु गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅटमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड आला. या विधानसभा क्षेत्रात फक्त १० टक्के ईव्हीएम मशीन अतिरिक्त असल्यामुळे ३४ बुथवरील मतदान बंदच राहीले.ईव्हीएम मशीन व व्हीव्हीटीपॅट उपलब्ध नसल्यामुळे मतदान सुरूच करता आले नाही. सुरूवातील ३५ केंद्रावरील मतदान बंद होते. परंतु प्रशासनाने बुथ क्र. १६६ सरस्वती महिला विद्यालय गोंदिया येथील मशीन दुरूस्त करून मतदान प्रक्रिया पुर्ववत करण्यात आली. ईव्हीएम मशीन किंवा व्हीव्हीटीपॅटमध्ये आलेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी ५ अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मोठ्या प्रमाणात बिघाड आल्यामुळे अनेक ठिकाणी अभियंत्यांना पोहचायला वेळ लागणार होता. व्हीव्हीटीपॅटच्या लिंक एरर च्या ९० टक्के तक्रारी असल्याचे वालस्कर यांनी सांगितले. या बुथवरील मतदान बंदबुथ क्र.१६ जि.प.हिंदी प्राथमिक केंद्रीय शाळा काटी, बुथ क्र.३३ जि.प. हिंदी प्राथमिक केंद्रीय शाळा बनाथर, बुथ क्र.३५ जि.प. हिंदी माध्यमिक शाळा बघोली, बुथ क्र.३६ जि.प. हिंदी माध्यमिक बघोली, बुथ क्र.४३ जि.प. हिंदी प्राथमिक शाळा बिरसी, बुथ क्र.४४ जि.प. हिंदी प्राथमिक शाळा रायपूर, बुथ क्र.५० जि.प. प्राथमिक शाळा सोनपूरी, बुथ क्र.५२ जि.प. प्राथमिक शाळा लोहारा, बुथ क्र.९४ जि.प. उच्च प्राथमिक शाळा रतनारा, बुथ क्र.१०९ जि.प. मराठी प्राथमिक केंद्रीय शाळा अजुर्नी, बुथ क्र.११५ जि.प. मराठी उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा, बुथ क्र.११६ जि.प. मराठी उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा, बुथ क्र.११७ जि.प. मराठी उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा, बुथ क्र.१२० जि.प. हिंदी प्राथमिक शाळा झिलमिली, बुथ क्र.१२३ जि.प.हिंदी माध्यमिक शाळा लंबाटोला-गिरोला, बुथ क्र.१२७ जि.प. हिंदी माध्यमिक शाळा पांजरा, बुथ क्र.१३५ जि.प. मराठी  प्राथमिक शाळा कटंगीकला, बुथ क्र.१३८ जि.प. मराठी माध्यमिक मुले मुली शाळा कटंगीकला, बुथ क्र.१६९ बी.एच. जे. कॉलेज गोंदिया, बुथ क्र.१९४ मनोहर म्युनिसीपल हायर सेकेंडरी स्कूल गोंदिया, बुथ क्र.१९५ महावीर मारवाडी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा गोंदिया, बुथ क्र.२०० एन. पी. मराठी प्राथमिक शाळा सिव्हील लाईन गोंदिया, बुथ क्र.२०६  जे. एम. हायस्कूल सिव्हील लाईन गोंदिया, बुथ क्र.२१५ श्री गुरूनानक प्राथमिक शाळा गोंदिया, बुथ क्र.२१८ बी. एन. आदर्श सिंधी विद्या मंदिर हायस्कूल गोंदिया, बुथ क्र.२२५ एन.पी. मराठी गणेशनगर गोंदिया, बुथ क्र.२३३ माताटोली म्युनिसिपल हायस्कूल गोंदिया, बुथ क्र.२४० एन.पी. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा गोंदिया, बुथ क्र.२५० एन.पी. मराठी हिंदी मालवीय शाळा गोंदिया, बुथ क्र.२५३ सरस्वती शिशू मंदिर मूर्री रोड गोंदिया, बुथ क्र.२७१ संत तुकाराम हायस्कूल कुडवा नाका गोंदिया, बुथ क्र.२७६ मनोहर म्युनिसीपल हायस्कूल इंग्लिश गोंदिया, बुथ क्र.२७६ (ए) अनाग्रीकर धम्मपाल सार्वजनिक वाचनालय गोविंदपूर गोंदिया, बुथ क्र.३०३ (ए) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलचूरपेठ गोंदिया येथील मतदान बंद आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक