शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

१४३ केंद्रांवर आज मतदान

By admin | Updated: January 8, 2017 00:12 IST

गेल्या महिनाभरापासून सुरू अस९लल्या नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला शनिवारी (दि.७) रात्री विराम लागला.

३५८ बॅलेट युनिट्स : १,१५,६०७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क गोंदिया : गेल्या महिनाभरापासून सुरू अस९लल्या नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला शनिवारी (दि.७) रात्री विराम लागला. रविवारी (दि.८) शांततेत मतदान करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यामध्ये गोंदियात १४३ मतदान केंद्रांवरून मतदान केले जाणार असून शहरातील १,१५,६०७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रविवारी होत असलेल्या मतदान प्रक्रीयेसाठी प्रशासन कामाला लागले आहे. शनिवारी निवडणूक ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना शासकीय तंत्रनिकेतनमधून साहित्य वाटप करण्यात आले. मागील २० दिवसा नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच जोर पकडला होता. १७ डिसेंबर रोजी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापासूनच निवडणुकीचे रंग पकडला होता. आता निवडणूक शेवटच्या टप्यात आली असून रविवारी (दि.८) मतदान केले जाणार आहे. मतदानाच्या या प्रक्रीयेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात १४३ मतदान केंद्रांवरून मतदानाची प्रक्रीया केली जात आहे. यात ३५८ बॅलेट युनिट्स लागणार असून प्रत्येक केंद्रावर चार कर्मचारी व एक पोलीस लावले जाणार आहेत. यात एक केंद्र प्रमुख व तीन सहकारी राहतील. अशाप्रकारे एकूण ५७२ कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली असल्याची माहिती आहे. मतदानाची प्रक्रीय रविवारी (दि.८) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे शहरातील २१ प्रभागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत उमेदवारांची संख्या बघता बॅलेट युनिट्स लावण्यात आले आहेत. यात प्रभाग क्रमांक १, २, ३, ५, १२, १३, १५, १६, १८, २० आणि २१ या एकूण ११ प्रभागांत ३ बॅलेट युनिट लावण्यात आले आहेत. तर प्रभाग क्रमांक ४, ६, ७, ८, ९, १०, ११, १४, १७, १९ या एकूण १० प्रभागांत २ बॅलेट युनिट्स लावण्यात आले आहेत. - अनेकांनी केला आचारसंहितेचा भंग बसपाचे अध्यक्षपदाचे उमेदवार पंकज यादव (५०) व त्यांचे भाऊ लोकेश उर्फ कल्लू सुंदरलाल यादव (४०) यांनी शुक्रवारी रात्री ९.४० वाजता सिंधी कॉलनी, शंकर नगरात प्रचारसभा घेतली. त्या सभेची परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर भादंविच्या कलम १८८ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आंबाटोली रमाबाई आंबेडकर वॉर्ड रेल्वे चौकीजवळील हनुमान मंदिराच्या चावडीवर मतदारांना आमिष देऊन आचारसंहितेचा भंग केल्याने नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे यांच्या तक्रारीवरून सुनील देवाजी भालेराव यांच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम १५३ (अ) ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रभाग क्र.१४ च्या अपक्ष उमेदवार मंगला विष्णु नागरिकर (३५) रा.छोटा गोंदिया यांनी छोटा गोंदियाच्या दुर्गा मंदिरासमोर परवानगी न घेताच प्रचारसभा घेतली. त्यामुळे त्यांच्यावर भादंविच्या कलम १८८ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.