शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील ध्वजारोहणावरून आमगावात पेटले राजकारण

By admin | Updated: August 19, 2015 01:58 IST

समानता आणि राष्ट्रीय ऐक्याची शिकवण ज्या शाळेतून मुलांमध्ये रुजविण्यात येते, त्याच शाळेत जातीय समीकरणाला ....

वरिष्ठांकडे तक्रार : शाळा समिती अध्यक्षाला मज्जावआमगाव : समानता आणि राष्ट्रीय ऐक्याची शिकवण ज्या शाळेतून मुलांमध्ये रुजविण्यात येते, त्याच शाळेत जातीय समीकरणाला राजकीय रुप देऊन दलित समाजातील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाला ध्वजारोहण करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे तक्रारींमधून करण्यात आली.आमगाव जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम झाला. यावेळी गाव प्रमुख म्हणून सरपंच यांना ध्वजारोहणाचा पहिला मान देण्यात येते. परंतु आमगाव आता नगर पंचायत झाल्यानंतर सरपंचाचे पद संपुष्टात आले. त्यामुळे शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम नंदेश्वर यांच्या हस्ते व्हावे असे ठरले. परंतु जातीय समीकरण आडवे आले आणि मुख्याध्यापक डी.व्ही.बहेकार यांनी आमगावचे तहसीलदार राजीव शक्करवार यांच्याशी संगनमत करून वेळेवर ध्वजारोहणासाठी अतिथींच्या नावात बदल करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम नंदेश्वर यांना वेळेवर ध्वजारोहण करण्यास मज्जाव करून तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना बोलावून ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. यावेळी उपस्थितांनी मुख्याध्यापकांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत झालेल्या प्रकाराची तक्रार नोंदविली. (शहर प्रतिनिधी)