शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:30 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून निवडणुकीसंदर्भात माहिती देताना ते बोलत होते.या वेळी प्रामुख्याने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ उपस्थित होते.काळे पुढे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली असून आचारसंहितेची माहितीसुध्दा निवडणूक आयोगाने दिली आहे.सदर अधिसूचनेद्वारे ३ मे रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिध्द करणे, १० मे अर्ज भरण्याची मुदत, ११ मे उमेदवारी अर्जांची छाणनी करणे, १४ मे अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, २८ मे रोजी मतदान व ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. ही लोकसभा पोटनिवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षीत आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.सदर बैठकीला उपजिल्हाधिकारी (सामान्य) शुभांगी आंधळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, नायब तहसीलदार (निवडणूक) राजश्री मलेवार, तसेच जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन समाज पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित होते.