शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालयाच्या शासकीय जागेवर राजकीय डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:52 IST

तालुक्यातील मुख्य शहराच्या मध्यभागात नगर परिषद परिक्षेत्रात शासकीय जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राच्या भूखंडावर राजकीय पुढारी व जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांचा....

ठळक मुद्देरूग्णसेवा उघड्यावर : रूग्णालय परिसरात व्यापारीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील मुख्य शहराच्या मध्यभागात नगर परिषद परिक्षेत्रात शासकीय जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राच्या भूखंडावर राजकीय पुढारी व जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांचा राजकीय डोळा असल्याने या जागेवर व्यापारी गाळे तयार करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे रुग्ण सेवा आक्सिजनवर आली आहे.नगर परिषद परिक्षेत्रात प्राथमिक आरोग्य केद्र बनगाव आरोग्य सेवेसाठी तत्परतेने पुढे येत आहे. रुग्णालयील रुग्णसेवा वर्षातील सेवेचा व्याप वाढवित अनेक उपाययोजना रुग्णांसाठी कार्यान्वित करीत आहे.सदर रुग्णालयाची मूर्ती लहान पण किर्ती महान आहे. महिला व बालकांसाठी रुग्णालयातील सेवा तत्परतेने पुढाकार घेत आहेत. आवश्यक सुविधा अपुºया असून सुध्दा रुग्णांना मुबलक उपचार व सुविधा देण्यासाठी रुग्णालय प्रशासन पुढाकार घेताना दिसत आहे.रुग्णालयात अद्यावत प्रयोगशाळा, औषधी, भांडार कक्ष, आंतररुग्ण कक्ष, बाह्यरुग्ण कक्ष, अतिदक्षता कक्ष, साथीच्या रुग्णांसाठी कक्ष, प्रसूती महिलांसाठी स्वतंत्र कक्ष यासह कार्यालयीन विभागातील कक्ष तर सेवा देणाºया वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कक्ष यासाठी नवीन प्रशस्त इमारतीची आवश्यकता आहे. परंतु या सुविधा उपलब्ध नसूनही रुग्णसेवा कार्यरत आहे. हे या रुग्णालयाचे दुखने असूनही रूग्णालयाचे मोठेपण दिसत आहे. रुग्णालय परिसरात तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेही कार्यालय आहे. या कार्यालयात विविध कक्षाची आवश्यकता आहे. परंतु जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव व निधी मिळत नाही.रुग्णालय परिसरात रुग्णालय इमारतीला मोकळी जागा सहा मीटरपर्यंत आहे. परंतु रुग्णालय सेवेसाठी महत्वपूर्ण जागेवर व्यापारी गाळे बांधकाम करण्यात येत आहेत. त्यामुळे तातडीच्या सेवेतील अ‍ॅम्बुलंस व स्ट्रेचर नेण्यासाठी जागाच उरली नाही. व्यापारी गाळे बांधकामामुळे रुग्णांना दोन मीटर जागेतूनच रुग्णालयात औषधोपचार करण्यासाठी वैद्यकीय कक्षात जावे लागणार आहे. त्यामुळे व्यापारी गाळे बांधकाम रुग्णांसाठी व उपचार सेवेसाठी डोकेदुखी ठरली आहे. राजकीय पुढारी व जिल्हा परिषद प्रशासन या जागेवर आवश्यक नसतानाही व्यापारी गाळ्यांच्या माध्यमाने रूग्णसेवा बाधित करीत आहे. याविरूध्द नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करून शासनाकडे तक्रार दाखल केली आहेत. शासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.