शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांमुळे यंदाची दिवाळी ठरणार राजकीय!

By admin | Updated: October 27, 2016 00:34 IST

गोंदिया जिल्ह्यातील दोन आणि भंडारा जिल्ह्यातील चार नगर पालिकांचे अध्यक्ष व नगरसेवकांच्या

होर्डिंग्जविना शहर स्वच्छ : शुभेच्छांचे फलकही हटलेगोंदिया/भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील दोन आणि भंडारा जिल्ह्यातील चार नगर पालिकांचे अध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला वेग आला आहे. या निवडणुकीची सुरूवात दिवाळीपूर्वीच होणार असल्याने यंदाची दिवाळी इच्छुक उमेदवारांसाठी राजकीय ठरणार आहे. परंतु या निवडणुकीत कुणाला फटाके लागतात, हे येणारा काळच ठरविणार आहे.दिवाळी हा सर्वांसाठी महत्त्वाचा सण असला तरी राजकीय नेतेमंडळीसाठी होर्डिग्ज, बॅनर्स, पोस्टर्स लावून शुभेच्छा देण्यासाठी पर्वणीचा काळ असतो. परंतु विधान परिषद निवडणुकीची भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता नेतेमंडळींना होर्डीग्जवर शुभेच्छा देता येणार नाही. शुभेच्छा देण्यासाठी स्रेहमिलन कार्यक्रम करावे लागणार आहे. याशिवाय मतदारांच्या व्यक्तीगत भेटी घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे होर्डिग्जच्या माध्मातून कोरड्या शुभेच्छांनी यावर्षी भागणारे नसल्याचे चित्र आहे.भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी या तीन नगर पालिकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे तर साकोली नगरपालिका नव्याने अस्तित्वात आली आहे. या चारही नगरपालिकेत अध्यक्ष, नगरसेवकांच्या पदासाठी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने आता निवडणुकीच्या घडामोडींना व वेगवेगळ्या नावाच्या चर्चेला उधाण येणार आहे. निवडणुकीची तारीख घोषित होण्यापूर्वी काही इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. त्यादृष्टीने मोर्चेबांधणीला सुरूवात केली. निवडणुकीमुळे नगर पालिकेच्या हद्दीतील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. १९ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. आयोगाच्या निर्देशानुसार सर्व प्रक्रिया आटोपल्यानंतर नगर पालिकेच्या प्रचारात रंगत येणार आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. यामुळे कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येतील. नामनिर्देशनसाठी संगणक प्रणाली पालिका निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीनुसार व नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होईल. ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवाराला उमेदवारी अर्ज व शपथपत्र सहज भरता यावे, यासाठी एक संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)शिवसेना, मनसे उतरणार आखाड्यात?१९ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे. या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज घेणे सुरू झाले आहे. या निवडणुकीत शिवसेना उमेदवार लढविणार आहे. दरम्यान, याबाबत मुंबईत शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बुधवारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नामांकन अर्ज घेण्यात येणार आहे. हे दोन्ही उमेदवार अन्य जिल्ह्यातील असून आयात करण्यात येणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा तेवढी शिल्लक आहे.