शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

पोलीस कल्याण निधी वांझोटाच

By admin | Updated: February 23, 2016 02:16 IST

मागील चार वर्षापासून पोलिसांच्या कल्याणासाठी निधी संकलित करण्यात आला नाही. चार वर्षापूर्वी कोट्यवधीच्या

गोंदिया : मागील चार वर्षापासून पोलिसांच्या कल्याणासाठी निधी संकलित करण्यात आला नाही. चार वर्षापूर्वी कोट्यवधीच्या घरात असलेला पोलीस कल्याण निधी आताच्या स्थितीत फक्त १८ लाख शिल्लक आहे. त्यात भर घालून पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना राबविण्याची दृष्टीच सध्याच्या पोलीस प्रशासनात नसल्यामुळे हा निधी वांझोटा ठरत आहे.चार वर्षापूर्वी जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी पोलिसांच्या कल्याणासाठी लागोपाठ दोन वर्ष मोठे कार्यक्रम घेऊन मोठा निधी जमविला होता. त्यात एका वर्षी प्रसिद्ध आॅर्केस्ट्रा घेतला तर दुसऱ्या वर्षी शिर्डीचे साईबाबा या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते. एका नाट्यप्रयोगातूनच ४ कोटीच्या वर पोलीस कल्याण निधी गोळा केला होता. खर्च वजा जाता ३ कोटींपेक्षा जास्त निधी जमा होता. त्यातून पोलिसांसाठी कमी किमतीत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी दुकान सुरू करण्यात आले. पोलिसांसाठी वाचनालय, जीम, सोसायटी सुरू केली. मात्र गेल्या तीन वर्षापासून पोलीस कल्याण निधीसाठी पोलीस अक्षीक्षकांकडून कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न केल्यामुळे तीन कोटीच्या वर असलेला निधी फक्त १८ लाखांवर आला आहे. या कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करणे, उन्हाळी शिबिर आयोजित करणे, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, जीमचे साहित्य, वाचनालयावर खर्च व पोलिसांच्या कल्याणासाठी इतर कार्यक्रमांचे आयोजन या निधीतूनच केले जाते. कल्याण निधीत कार्यक्रमाच्या माध्यमातून पैशाची भर पडल्यास इतरही अनेक उपक्रम राबविले जाऊ शकतात. परंतू त्याबाबत विद्यमान पोलीस प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. शिल्लक असलेला निधी फक्त खर्च केला जात असल्याने शिल्लक असलेले १८ लाख रूपये खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासनाने पोलिसांच्या कल्याणासाठी नवनवीन प्रकल्प राबवावेत आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात अधिक सोयीसुविधा निर्माण कराव्यात अशी अपेक्षा केली जाते.(तालुका प्रतिनिधी)गोंदियावासीय करतात चांगल्या अधिकाऱ्यांवर प्रेम४ गोंदिया पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून १२ हजार रूपये गोंदिया पोलीस विभागाकडून देण्यात येतात. कल्याण निधीत वाढ झाल्यास ही रक्कम वाढविणे शक्य होणार आहे.४ पो.अधीक्षक हक यांच्या कार्यकाळात दोन मोठ्या कार्यक्रमांमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला भुर्दंड बसला. तरीही हक यांची बदली झाली त्यावेळी बहुतांश राजकीय मंडळींसह सर्वसामान्य नागरिक त्यांची बदली रद्द करण्याची मागणी करताना दिसले. आता मात्र हे चित्र पहायला मिळत नाही. मार्च महिन्यात होणार आॅर्केस्ट्रा४गोंदिया पोलीस दलातील पोलिसांचा कल्याण निधी वाढावा यासाठी यंदा पोलीस अधीक्षकांनी मार्च महिन्यात आॅर्केस्ट्राचे कार्यक्रम आयोजित केले आहे. त्यासाठी जिल्हाभरातील ठाणेदार पोलीस कल्याण निधी संकलनासाठी फिरत आहेत. हक यांच्या कार्यकाळात गोळा केलेल्या निधीचा आकडा पार करणे यावेळी पोलिसांना शक्य आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.