शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

पोलीस कल्याण निधी दोन वर्षांपासून वांझोटा

By admin | Updated: November 6, 2014 22:56 IST

तीन-चार वर्षापूर्वी कोटीच्या घरात असलेला पोलीस कल्याण निधीत फक्त ५० लाखावर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात राबणाऱ्या पोलिसांसाठी विशेष योजना पोलीस विभाग राबवित नसल्याची खंत

गोंदिया : तीन-चार वर्षापूर्वी कोटीच्या घरात असलेला पोलीस कल्याण निधीत फक्त ५० लाखावर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात राबणाऱ्या पोलिसांसाठी विशेष योजना पोलीस विभाग राबवित नसल्याची खंत पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन वर्षात कल्याण निधीत भर घालण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नसल्याने हा निधी वांझोटा ठरला आहे.गोंदिया जिल्ह्यात २ हजारांपेक्षा अधिक पोलीस कार्यरत आहेत. २४ तास सेवा देऊन नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांना त्यांच्याच विभागाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नाही. पोलिसांच्या कल्याणासाठी असलेला जिल्ह्याचा निधी दिवसेंदिवस खुंटत चालला आहे. आजघडीला जिल्ह्याच्या पोलीस कल्याण निधीत फक्त ५० लाख रुपये असल्यामुळे पोलिसांसाठी राबविण्यात येईल अशी नवीन संकल्पना सुरू करण्याजोगा पैसाच उपलब्ध नसल्याचे समजते. चार वर्षांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुवेझ हक यांनी संगीत रजनीचे आयोजन करून कोटीच्या घरात निधी जमा केला होता. त्यानंतर साईबाबावर आधारित नाट्य प्रयोगाचे आयोजन करून दीड कोटीच्या घरात पोलीस कल्याण निधी जमा केला होता. परंतु त्यानंतर पोलीस कल्याण निधी वाढविण्यासाठी कोणीच प्रयत्न न केल्यामुळे पोलीस कल्याण निधीत फक्त ५० लाख रुपये उरले आहेत. यातूनच प्रत्येक महिन्याला पोलिसांसाठी कॅटीनमध्ये साहित्य आणावे लागते. महिन्याकाठी १६ ते १७ लाख रुपये किंमतीचे साहित्य आणावे लागते. या कल्याण निधीतून पोलिसांसाठी असलेल्या वाचनालयावरील खर्च केला जातो. याचा लाभ १०० कर्मचारी-अधिकारी लाभ घेतात. व्यायाम शाळा याच निधीतून चालविण्यात येते. याचा लाभ २०० अधिकारी-कर्मचारी घेतात. जिल्हा क्रीडा स्पर्धा, पोलीस कुटूंब आरोग्य योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाअंतर्गत बी.ए., एम.बी.ए. अभ्यासक्रम चालविण्यात येतात. सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार याच निधीतून खर्च केला जातो. आरोग्य शिबिराचे आयोजनही केले जाते. यावर्षी पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या मुलांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले नव्हते. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही झाला नाही. फटाके विक्री केली जाते. तसेच इतर विविध कामे या पोलीस कल्याण निधीतून केली जातात. दोन वर्षापासून पोलीस कल्याण निधीसाठी एकाही कार्यक्रमाचे आयोजन न झाल्यामुळे पोलीस कल्याण निधी खुंटत चालला आहे. आणखी काही दिवसात आहे तो निधीही संपून जाईल. त्यामुळे सुरू केलेले उपक्रम नियमितपणे चालावे यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद कुठून करणार असा प्रश्न निर्माण होत आहे. (तालुका प्रतिनिधी)