शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस व्यवस्था जनतेच्या सोयीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2017 00:55 IST

पोलीस व्यवस्था ही सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी व रक्षणासाठी आहे. सामाजिक संतुलन राखण्याचे

मोहन खांदारे : ‘रेझिंग डे’ निमित्त उद्बोधन कार्यक्रम सालेकसा : पोलीस व्यवस्था ही सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी व रक्षणासाठी आहे. सामाजिक संतुलन राखण्याचे प्रयत्न करीत असामाजिक व गैरकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यास पोलीस महत्वाची भूमिका पार पाडते. अशात पोलीस विभागाला जनसहकार्य मिळणेसुध्दा तेवढेच महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सालेकसाचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी केले. ते शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालयात पोलीस दल स्थापना दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते. प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्ट गोंदिया द्वारे संचालित शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा आणि पोलीस विभाग सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस दल स्थापना दिवस (रेझींग डे) व भारताची आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती हे दोन्ही कार्यक्रम संयुक्तरित्या घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अपर्णा खुरसेल होत्या. उद्घाटन ठाणेदार मोहन खांदारे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस विभागातील बिट जमादार उकरे, नेवारे, सुनिता दसरिया, भावगिरी कटरे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सुरूवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला अभिवादन करीत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ठाणेदार खांदारे यांनी महिलांसाठी बनलेल्या कायद्यांवर मार्गदर्शन केले. समाजात महिलांच्या स्थितीबद्दलसुध्दा मार्गदर्शन केले. अपर्णा खुरसेले यांनी महिलांनी स्वत:ची योग्यता ओळखून त्याचा उपयोग करीत आत्मसन्मानाने जगण्याचे आवाहन केले. यावेळी इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीसुध्दा समयोचित मार्गदर्शन केले. कायद्याचा कसा सन्मान केला पाहिजे, याबद्दल माहिती दिली.संचालन प्रवीण पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन गिरीष देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक, विद्यार्थी तसेच पोलीस कर्मचारी आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) महाविद्यालयात आयोजित पोलीस दल स्थापना दिवस व सावित्री फुले जयंती कार्यक्रमात बोलताना पोलिस निरीक्षक खांदारे.