शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२५६० उमेदवारांची पोलीस भरतीला दांडी

By admin | Updated: April 14, 2016 02:26 IST

जिल्हा पोलीस विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या शिपाई पदाच्या ४० जागांसाठी २९ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली.

उन्हाचा तडाखा : ४० जागांसाठी ३५६८ उमेदवारांची शारीरिक चाचणीगोंदिया : जिल्हा पोलीस विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या शिपाई पदाच्या ४० जागांसाठी २९ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. जिल्ह्यात ६ हजार १२८ महिला-पुरूष उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु यंदाच्या भरतीला उन्हाचे चटके लागणार असे गृहीत धरून २ हजार ५६० उमेदवार या भरतीला हजर झालेच नाही. भरती प्रक्रिया सुरू असताना गोंदिया जिल्ह्याचा पारा ४२ अंशावर चढला. परंतु दरवर्षी प्रमाणे यंदाही उन्हात शारीरिक चाचणी होऊ शकते असे गृहीत धरून गोंदिया पोलीस दलाच्या जोगसाठी अर्ज करणाऱ्या पुरूषांपैकी १ हजार ९३५ तर महिलांपैकी ६२५ महिला गैरहजर राहिल्या. यावर्षी सर्व आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. त्यात ४ हजार ४९३ पुरूषांचे अर्ज आले. त्यातील २ हजार २५८ पुरूषांनी शारिरिक चाचणी दिली. या शारिरिक चाचणीत व कागदपत्रात १ हजार ९५८ पुरूष पात्र झाले.तर ६०० जण अपात्र झाले. महिलांचे १ हजार ६३५ अर्ज आले होते. त्यातील १०१० महिला शारीरिक चाचणीसाठी हजर झाल्या. यातील २७५ महिला पात्र तर ७३५ महिला अपात्र झाल्या. महिला, पुरूष असे मिळून ३ हजार ५६८ जणांनी शारिरिक चाचणी दिली. गोंदिया जिल्ह्यातील उमेदवारांना यावर्षी चटके लागणार नाही अशी व्यवस्था गोंदिया पोलिस विभागाने केली होती. त्यामुळे उन्हाचे चटके यावर्षी तरूणांना लागले नाही. (तालुका प्रतिनिधी)लेखी परीक्षा १९ किंवा २० रोजीशारिरिक चाचणी उतीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणार नाही. एका पदामागे १५ उमेदवार घेण्यात येणार आहे. त्यामुळे ४० पदासाठी ६०० उमेदवारांना बोलावले जाणार असल्याचे अपेक्षित असले तरी एकाच सारखे गुण शेकडो मुलांनी घेतल्यामुळे टक्केवारीनुसार समान आकडा असलेल्या सर्व मुलांना लेखी परीक्षेसाठी त्या सर्वाना बोलावण्यात येणार आहे. त्यामुळे ८०० ते ९०० उमेदवारांना बोलावल्या जाण्याची शक्यता आहे. १९ किंवा २० एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली.