शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचारी बनणार पोलिसांचे पंच

By admin | Updated: July 22, 2015 02:10 IST

गुन्ह्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच न्यायालयात सुनावणीच्या वेळेत फितूर होतात.

गोंदिया : गुन्ह्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच न्यायालयात सुनावणीच्या वेळेत फितूर होतात. त्यामुळे गृहविभागाने पंचनाम्याच्या कामामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा आदेश नुकताच काढला आहे. त्यामध्ये शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या यादीसह संबंधित पोलीस ठाण्यांना आदेश येऊन धडकले आहेत. या आदेशामुळे पोलिसांच्या पंचनाम्याचे ओझे आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाठीवर येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनस्तापात भर पडणार आहे.एखादा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा व वेळोवेळी पुरावा गोळा करताना तपासी अधिकारी पंचनामा करीत असतात. अशा पंचनाम्याच्यावेळी उपस्थितीत असलेल्या पंचाचे बयाण खटल्यांच्या सुनावणीदरम्यान महत्त्वाचे ठरते. गुन्हा घडल्यानंतर खटला सुनावणीसाठी येण्याकरिता काही प्रकरणांमध्ये बराच कालावधी उलटून गेलेला असतो. तपासी अधिकाऱ्याने तत्कालिन परिस्थितीत उपस्थित केलेले पंच सुनावणीदरम्यान प्रामाणिक राहतील याची खात्री नसते. ऐनवेळी पंच फितूर होत असल्यामुळे बऱ्याचशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे दोषारोपसिद्ध होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण घटत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतल्यास सुनावणीदरम्यान पंच फितूर होण्याची शक्यता फार कमी राहणार असल्याचे गृहविभागाने ठरविले आहे. त्यामुळे न्यायालयात गुन्हेगारांना शिक्षा होण्यास मदत होणार आहे.शिक्षण मंडळासह इतरही विभागाने नुकतेच या संदर्भातील आदेश सर्व शाळांतील मुख्याध्यापकांसह अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या आवश्यकतेनुसार शाळेतील किंवा एका अधिकाऱ्याची नोडल आॅफीसर म्हणून नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी त्याचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक जवळच्या पोलीस चौकीत असणार आहेत. पोलिसांना त्याची गरज भासेल तेव्हा त्यांना तात्काळ कामातून मुक्तता द्यावी असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्याचा खटला न्यायालयात सुरू असताना पंचाची साक्ष महत्त्वाची असते पण त्यावेळी नेमलेले पंच प्रामाणिक राहतील याची खात्री नसते व पंच फितूर झाल्यामुळे अनेक गुन्ह्यात आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यासह शिक्षकही पंचनाम्यासाठी पंच म्हणून ठेवण्यात येणार आहेत. या आदेशामुळे शिक्षकासह इतरही कर्मचाऱ्यांत खळबळ माजली आहे. (शहर प्रतिनिधी)