गोंदिया : नवीन वर्ष व पोलीस स्थापना दिनानिमित्त सोमवारी (दि.२) सकाळी १० वाजता पोलीस पाटील कार्यशाळेचे आयोजन पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भूजबळ पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणीची बैठक बोलावून पोलीस पाटील कार्यशाळाचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी काळे, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय कुडेडकर, तसेच उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर संबोधित करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांनी कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, जिल्हाध्यक्ष सोमा शेंडे, कोषाध्यक्ष दिलीप मेश्राम, उपाध्यक्ष आनंद तुरकर, मोहनसिंह बघेले, मनोहरसिंह चव्हाण, डी.जे. पटले, राजेंद्र बन्सोड, हेमराज सोनवाने, टेंभरे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)
पोलीस पाटलांची कार्यशाळा आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 00:48 IST