शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांनी गावाचा प्रमुख समजून कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 20:36 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगावच्या सभागृहात पोलीस पाटलांची जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली.

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : पोलीस पाटील कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतगोरेगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगावच्या सभागृहात पोलीस पाटलांची जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अतिथी म्हणून तहसीलदार कल्याणकुमार डहाट, पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, पोलीस निरीक्षक सुरेश नारनवरे, जिल्हाध्यक्ष दिलीप मेश्राम, कार्याध्यक्ष आनंदराव तुरकर, श्रीराम झिंगरे, नंदा ठाकरे, अनिता लंजे, गायत्री पवार, विजय घाडगे, यशवंत ईरडंडे, मुरारी दहीकर उपस्थित होते.कार्यशाळेला ७०० पोलीस पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी पोलीस पाटील हा गाव पातळीवरील शासनाचा प्रतिनिधी आहे. त्यांनी गावचा जिल्हाधिकारी समजून कामे करावी, बदलत्या काळात पोलीस पाटलांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.पोलीस पाटलांनी अनेक कामासाठी सहकार्य केले आहे.आपण संगठीत शक्तीचा वापर विधायक कार्यासाठी करीत आहात. आपल्या समस्या सोडविण्यासाठी मी असल्याची ग्वाही देतो असे म्हणाले.पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भूजबळ म्हणाले, गुन्हेगारावर वचक निर्माण होईल असे कार्य पोलीस पाटलांनी करावे. जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे उर्वरित प्रवास भत्याची रक्कम लवकरच देण्यात येईल. जिल्हा स्तरावर पोलीस पाटील भवनाकरिता जागा उपलब्ध होईपर्यंत प्रेरणा सभागृहाचा वापर कार्यक्रमासाठी करावा असे सांगितले. याप्रसंगी महाराष्टÑ राज्य ग्रामीण कामगार पोलीस पाटील संघटनेच्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक भृंगराज परशुरामकर, संचालन राजेश बन्सोड तर आभार दिलीप मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोमेश कटरे, परिमल ठाकूर, प्रेमलाल टेंभरे, गिरधारी रहांगडाले, प्रकाश कठाणे, युवराज साखरे, तोमेश कोहळे, माधोराव शिवणकर, सेवकराम चौरागडे, सोहनलाल मलकाम, रंजीत सहारे, सोमराज बघेले, हेमराज सोनवाने, आनंदराव परतेती यांनी सहकार्य केले.