शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

पोलीस निरीक्षकाच्या पत्नीने युवतीला रक्तदान करुन वाचविले प्राण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:27 IST

रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा : एबी निगेटिव्ह रक्ताची होती गरज पॉझिटिव्ह स्टाेरी गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दाखल ...

रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा : एबी निगेटिव्ह रक्ताची होती गरज

पॉझिटिव्ह स्टाेरी

गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दाखल एका युवतीला एबी निगेटिव्ह रक्ताची गरज होती. मात्र रक्तपेढीत तुटवडा असल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. दरम्यान याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना मिळाली. त्यांचा पत्नीचा रक्तगट एबी निगेटिव्ह असल्याने त्यांनी पत्नीसह लोकमान्य ब्लड बँक गाठून त्यांच्या पत्नीने रक्तदान केले. वेळीच रक्त मिळाल्याने युवतीचे प्राण वाचविणे शक्य झाले.

कोरोनामुळे सध्या रक्तदान शिबिरे बंद आहे. तर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा व्यापक स्तरावर सुरु आहे. त्यामुळे येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बरेचदा गरजू रुग्णांसाठी रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. असाच प्रकार शुक्रवारी (दि. ३०) बाई गंगाबाई महिला रुग्णालयात घडला. या रुग्णालयात दाखल असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला एबी निगेटिव्ह रक्ताची गरज होती. मात्र गोंदिया रक्तपेढीत आणि खासगी रक्तपेढीत सुद्धा या रक्ताचा साठा नव्हता. त्यामुळे या तरुणीचा जीव धोक्यात आला होता. दरम्यान यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांशी संपर्क करण्यात आला. गोंदिया येथील रक्त मित्र गुड्डू चांदवानी यांच्याकडे रक्तदात्यांची यादी होती. त्या यादीतील काही व्यक्तींशी संपर्क साधला. चांदवानी यांनी संदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्याशी संपर्क साधृून त्यांना याची माहिती दिली. तायडे लगेच त्यांच्या पत्नीचा रक्तगट एबी निगेटिव्ह असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी पत्नी किरणसह लोकमान्य ब्लड बँक गाठून रक्तदान केले. तायडे यांच्या पत्नीने वेळीच रक्तदान केल्याने त्या तरुणीचे प्राण वाचविणे शक्य झाले. एबी निगेटिव्ह रक्त हे फारच दुर्मिळ समजले जाते. मात्र रक्तदान हे महान दान समजून वेळीच माणुसकीचा परिचय देत किरण तायडे यांनी रक्तदान केल्याने तरुणीला नवसंजीवनी मिळाली.

.....

रक्त मित्रांमुळेच झाली मदत

येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात नेहमीच रक्ताचा तुटवडा पडतो. अशावेळी शहरातील अनेक स्वंयसेवी संस्थाचे पदाधिकारी व सदस्य रक्तदान करण्यासाठी धावून येतात. ते रक्तमित्र म्हणून काम करीत असतात. विनोद चांदवानी, रवी बोधानी, नितीन रायकवार या रक्तमित्रांमुळे युवतीचे प्राण वाचविणे शक्य झाले.

.......

कोट

कोणत्याही नात्यापेक्षा माणुसकीचे नाते हे सर्वात महत्त्वाचे आहे. संकट काळात मदतीला धावून जाणे यालाच माणुसकी म्हणतात हाच दृष्टिकोन बाळगून मी सुद्धा रक्तदान केले. गरजूंना रक्तदान करण्यासाठी इतरांनी सुद्धा निसंकोचपणे पुढे येण्याची गरज आहे.

- किरण तायडे (रक्तदाता)