शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना चकमा देऊन तीन ट्रक पळविले

By admin | Updated: November 2, 2016 00:22 IST

क्षमतेपेक्षा २५-३५ टन अधीक भार वाहून नेताना उप विभागीय पोलीस अधीकारी मंदार जवळे यांनी जप्त केलेले तीन ट्रक

पाच लाखांचा दंड चुकवला : उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केली होती कारवाई देवरी : क्षमतेपेक्षा २५-३५ टन अधीक भार वाहून नेताना उप विभागीय पोलीस अधीकारी मंदार जवळे यांनी जप्त केलेले तीन ट्रक पोलिसांना चकमा देऊन २९ आॅक्टोबर रोजी पळविण्यात आले. ठोठावण्यात आलेला पाच लाख रूपयांचा दंड भरता हे ट्रक पळविण्यात आल्याने देवरी पोलिसांनी ट्रक मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरटीओ नाक्याला वाचवून सालेकसा-देवरी मार्गे राष्ट्रीय महामार्गावर निघणाऱ्या ओव्हरलोड चार वाहनांवर उप विभागीय पोलीस अधिकारी जवळे यांनी १७ आॅक्टोबर रोजी कारवाई केली होती. आरटीओंना बोलावून या गाड्यांचे वजन केले असता त्यात प्रत्येकी क्षमतेपेक्षा २५ ते ३५ टन अतिरीक्त भार मिळून आला. चार ट्रक पैकी ट्रक क्रमांक सीजी ०७/एव्ही २४८ च्या मालकाने दंड भरून आपला ट्रक सोडवून नेला. परंतु, कमलजीतसिंह महेंद्रसिंग (रा.भिलाई) यांच्या ट्रक क्रमांक सीजी ०७/सीबी ०९११, सीजी ०७/एक्स ९४११ व एमएच २०/एनई ३६११ यांना पाच लाख रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. यावर मात्र कमलजीतसिंह यांनी दंड न भरता न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात खटला सुरू असताना हे ट्रक पोलिसांना चकमा देऊन २९ आॅक्टोबर रोजी रात्री देवरी पोलीस ठाण्यासमोरून पळविण्यात आले. प्रकरणी देवरी पोलिसांनी ट्रक मालकाविरूद्ध कलम १८८, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उप निरीक्षक रामदास शेळके करीत आहेत. (प्रतिनिधी)प्रशासनावर ओव्हरलोड वाहन हावी पोलीस व परिवहन विभागाच्या नजरेसमोर सिरपूर तपासणी नाक्याच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या ढाब्यांवर दररोज शेकडो अधीक भार क्षमतेच्या वाहनांमधून अतिरीक्त भार दुसऱ्या वाहनांत टाकण्याचे अवैध कार्य कित्येक दिवसांपासून सुरू आहे. मात्र उभ्या वाहनांवर कारवाई करणे शक्य नसल्याचे आरटीओ अधिकारी सांगत आहेत. तर दुसरीकडे पोलीस विभाग या अवैध कामावर आळा का घालत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच आरटीओंची नजर चुकवून डोंगरगड, दरेकसा, सालेकसा, देवरी ते राष्ट्रीय महामार्गावर अधीक भारक्षमतेचे शेकडो वाहन दररोज जात असल्याने लाखोंचा महसूल बुडत आहे. राज्यात ओव्हरलोड वाहनांवर बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहन धावत आहेत. याला कोणाचे अभय मिळत आहे. याकडे आता तरी प्रशासन लक्ष देणार की नाही, की हे सगळ असच चालत राहणार हे सर्व प्रश्न नियमानुसार कार्य करित असलेल्या ट्रांसपोर्टर कडून उपस्थित केले जात आहे.