शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव येथील आरोपींची पोलीस कोठडी आजपर्यंत

By admin | Updated: May 29, 2017 01:46 IST

अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या देऊळगाव-बोदरा येथील शेतजमीन खरेदी विक्री सौद्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या देऊळगाव-बोदरा येथील शेतजमीन खरेदी विक्री सौद्याच्या व्यवहारापासून झालेल्या भांडणातून शिवलाल नारायण भांडे (४३) यांचा खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयाने २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीत पोलिसांना आरोपींनी काहीच माहिती दिली नसल्याने माहिती जाणून घेण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करणार आहेत. बुधवारी (दि.२४) रोजी देऊळगाव-बोदरा येथील शिवलाल भांडे या शेतकऱ्यांने एक वर्षापूर्वी आपल्या मालकीच्या शेतजमिनीपैकी अर्धा एकर शेती अंतारामझोळे यांना सप्टेंबर २०१६ मध्ये विक्री केली. त्या जमिनीच्या मोबदल्यात मिळणारा पैसा त्यांनी एकाच वेळी दिला नाही. मृतक शिवलाल त्यांना वारंवार पैशाची मागणी करायचा. शेतजमीन विक्री करतेवेळी शिवलालची पत्नी मंदा भांडे (३०) यांनी संबधीताकडे आक्षेप नोंदवून जमिनीची विक्री रद्द करावी, अशी लेखी तक्रार केली होती. १७ मे २०१७ रोजी परत एक एकर शेतजमिनीची विक्री झोळे परिवाराने शिवलाल भांडे याचेकडून करवून घेतली. शेतजमिनीच्या विक्री सौद्यामधील एकही रुपया आम्ही पाहिला नाही असे मृतकाची पत्नी, आई व बहिणीचे म्हणणे आहे. प्रती एकर ४ लाख ८० हजार रुपयाप्रमाणे सौदा झाल्याचे सांगितले जाते. दुसऱ्यांदा विक्री झालेल्या शेतजमिनी प्रकारावर सुध्दा पत्नीने आक्षेप नोंदविला. परंतु तक्रारीची साधी चौकशी करण्याची तत्परता निष्ठूर अधिकाऱ्यांनी दाखविली नाही. या संदर्भात देऊळगाव/बोदरा येथील देवानंद दयाराम झोडे (३५), रितेश माधोराव झोडे (२२), दिनेश अंताराम झोडे (२९), अंताराम मोडकू झोडे (४९), प्रभू द्याराम झोडे (३४), हेमराज तुलसीराम बोरकर (४३), माधोराव मोडकू झोडे (४५), रेखा माधोराव झोडे (४०) या आठ जणांवर भादंविच्या कलम ३०२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने या आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी त्या आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी आरोपींचे कपडे, नख, रक्त जप्त केले आहेत.