शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोवारीटोल्यातील मजुराच्या मुलीची बॉक्सिंगमध्ये राज्यस्तरापर्यंत धडक

By admin | Updated: September 25, 2016 02:25 IST

विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक आणि लागोपाठ राज्यस्तरिय स्पर्धेत कांस्यपदक कमविणारी काजल शहारे ही गोंदिया जिल्ह्याची पहिली बॉक्सर खेळाडू ठरली आहे.

पटकावले कांस्यपदक : काजलने वाढविला जिल्ह्याचा गौरवसालेकसा : विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक आणि लागोपाठ राज्यस्तरिय स्पर्धेत कांस्यपदक कमविणारी काजल शहारे ही गोंदिया जिल्ह्याची पहिली बॉक्सर खेळाडू ठरली आहे. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना एका गरीब मजुरवर्गीय कुटुंबातील काजलने पटकावलेले हे यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.काजलने संपूर्ण राज्यात टोकावरील गोंदिया जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. तिच्या या कामगिरीमुळे जिल्हाभरात ती कौतुकाचा विषय ठरली आहे. सालेकसा तालुक्यातील पोवारीटोला (कोटजमुरा) येथील मोलमजुरी करणारे रुपलाल शहारे यांची मुलगी काजल ही शहीद अवंती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोटजमुरा येथे बारावीची विद्यार्थिनी आहे. खेळात नेहमीच ती पुढे असते. परंतु घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि खेळाचे पोषक वातावरण ग्रामीण भागात नसल्याने अनेक वेळा तिला संधी गमवावी लागली. परंतु कराटे शिक्षक टी.ए. आलोत यांच्यासह प्रा.मंगेश ठाकरे, विजय मानकर यांनी तिचा उत्साह वाढविला. प्राचार्य माहुले यांनी तिला स्पर्धेत भाग घेण्याची संधी दिली. तालुकास्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सहज मजल मारत तिने वर्धा येथे झालेल्या नागपूर विभाग स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. यानंतर तिला राज्यस्तरावर भाग घेण्याची संधी मिळाली. नंदुरबार येथे राज्यस्तरिय स्पर्धा असल्याने तिथे जाऊन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिच्यापुढे अनेक अडचणी आल्या. एकीकडे आर्थिक अडचण तर दुसरीकडे ग्रामीण भागातील मुलगी असल्याने तिला पाठवावे की नाही, अशी काळजी. मात्र काजलची तीव्र उत्कंठा व शाळा संचालकांचे पाठबळ मिळाले आणि तिने आपल्या आईला सोबत घेऊन प्रा.मंगेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनात नंदूरबार गाठले. सतत प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात बॉक्सिंग करणाऱ्या राज्यस्तरावरील खेळाडूंसमोर काजल टिकेल का, हा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवत होता. मात्र सर्व शंका-कुशंकावर मात करीत दिग्गज खेळाडूंशी झुंज देत काजलने कांस्यपदक पटकावले. बॉक्सिंगमध्ये गोंदिया जिल्ह्यातून कांस्यपदक पटकावणारी काजल पहिलीची मुलगी ठरली. यामुळे तिने शाळेचेच नाही तर सालेकसा तालुक्यासह गोंदिया जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. (तालुका (प्रतिनिधी)-तर इतर मुलीही येतील पुढेतिच्या या कामगिरीमुळे इतर मुलींनाही प्रेरणा मिळून पुढे ग्रामीण भागातून आणखी प्रतिभावान खेळाडू निर्माण होतील, अशी आशा तिच्या प्रशिक्षकांना आहे. शासनाने अशा खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी मदत करावी अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.गोंदिया जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अमित बुद्धे व संस्थेचे सहसचिव दीपक सिक्का यांनी तिच्या या कामगिरीवर आनंद व्यक्त करीत तिचे अभिनंदन केले. तसेच अवंती ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भेरसिंह नागपुरे, सचिव महेन्द्रकुमार कुराहे यांनीही भरभरुन कौतुक केले.