शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

किटकनाशक फवारणीतून शेतकºयाला विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 21:59 IST

सालेकसा तालुक्याच्या मोहरानटोली येथील तिलकचंद गणपत बेंदरे (५०) हे शेतातील पिकांवर किटकनाशक फवारणी करताना त्यांना विषबाधा झाली.

ठळक मुद्देकृषी विभागाची बघ्याची भूमिका : तपासणी मोहीम थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सालेकसा तालुक्याच्या मोहरानटोली येथील तिलकचंद गणपत बेंदरे (५०) हे शेतातील पिकांवर किटकनाशक फवारणी करताना त्यांना विषबाधा झाली. ही घटना बुधवारी (दि.१८) रोजी घडली. त्यांना गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.किटकनाशक फवारणीमुळे २० शेतकºयांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली. त्यानंतर या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. यवतमाळ येथील घटनेनंतर वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात देखील शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे कृषी केंद्रामधून विक्री केल्या जाणाºया किटकनाशकांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला. विशेष म्हणजे काही कृषी केंद्र संचालकांकडून बंदी असलेल्या किटकनाशकांची विक्री केली जात असल्याची बाब पुढे आली. शिवाय ही किटकनाशके आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेशातून आल्याची ओरड सुरू झाली. किटकनाशक फवारणीमुळे शेतकºयांचा मृत्यू झाल्यानंतर गाढ झोपेत असलेल्या कृषी विभागाला जाग आली. कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून कृषी केंद्रामधील किटकनाशकांची पाहणी केली. मात्र गोंदिया कृषी विभागाने यानंतर कुठलीही शोध मोहीम राबविली नाही. त्यामुळे येथील कृषी विभागाला अद्यापही जाग आली नसल्याचे चित्र आहे. दरम्यान सालेकसा तालुक्यातील मोहारानटोली येथील तिलकचंद बेंदरे या शेतकºयाला किटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाची झोप उडाल्याचे चित्र आहे. दरम्यान आता कृषी विभाग नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.