शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पॅन कार्ड तयार करुन देण्याच्या नावावर लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 22:25 IST

शासनाने विविध कामांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य केले आहे. ही दोन्ही कागदपत्रे नसल्यास काम पुढे सरकत नाही.त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक पॅन कार्ड तयार करण्यासाठी धडपड करीत आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील नागरिकांना केले लक्ष : २०० ते ३०० रुपयांची वसुली

ऑनलाईन लोकमतगोंदिया : शासनाने विविध कामांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य केले आहे. ही दोन्ही कागदपत्रे नसल्यास काम पुढे सरकत नाही.त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक पॅन कार्ड तयार करण्यासाठी धडपड करीत आहे. नेमक्या याच संधीचा फायदा घेत जिल्ह्यात पॅन कार्ड तयार करुन देण्याचे आमीष दाखवून नागरिकांची लूट केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पॅन कार्ड तयार करुन देणाºया कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून गावा गावात पोहचून गावकºयांकडून अर्ज भरुन दोनशे ते तीनशे रुपयांचे शुल्क वसुल केले जात आहे. संबंधित प्रतिनिधीकडून अर्ज केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसात पॅन कार्ड तुमच्या घरी पोहचेल असे सांगितले जात आहे. मात्र महिनाभराचा कालावधी लोटून देखील पॅन कार्ड न आल्याने संबंधित प्रतिनिधीनी दिलेल्या कंपनीच्या पत्यावर गेले. मात्र तिथे गेल्यानंतर संबंधित प्रतिनिधी त्यांच्या कंपनीचे नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा या गावकºयांच्या आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत. हा प्रकार तिरोडा तालुक्यातील काही गावात सुरू असल्याची माहिती आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पॅन कार्ड तयार करण्यासाठी जिल्हा किंवा तहसील स्तरापर्यत धावपळ करावी लागू नये, यासाठी शासनाने पॅन कार्ड तयार करुन देण्यासाठी काही कंपन्याना परवानगी दिली आहे. या कंपन्या गावा गावात पॅन कार्ड तयार करण्याचे शिबिर घेत आहे. कोणत्याही जिल्ह्यात शिबिर घेण्यापूर्वी या कंपनीला जिल्हाधिकाºयांकडून परवानगी घ्यावी. शासनाने संबंधित कंपनीला पॅन कार्ड तयार करुन देण्याचे प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यानंतरच त्यांना शिबिर घेता येते. ज्या गावात शिबिर घ्यायचे आहे त्या गावातील सरपंच व ग्रामसेवकांना पत्र देऊन परवानगी घ्यावी लागते. पॅन कार्ड तयार करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केवळ एकाच कंपनीला मंजुरी दिल्याची माहिती आहे. मात्र जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता काही बोगस प्रतिनिधी सध्या जिल्ह्यात पॅन कार्ड तयार करुन देण्याचे काम करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितावर कारवाही करण्याची गरज आहे.कंपनीच्या अर्जांची झेरॉक्सपॅन कार्ड तयार करुन देण्याच्या नावावर काही बोगस प्रतिनिधी परवानगी असलेल्या कंपनीच्या अर्जांची झेरॉक्स करुन ते पॅन कार्ड तयार करण्यासाठी भरुन घेत आहे. तसेच त्यासाठी शुल्क घेत आहे. मात्र जेव्हा नागरिक दिलेली मुदत झाल्यानंतर संबंधित कंपनीच्या पत्तावर पोहचल्यानंतर त्यांना सदर अर्ज त्यांच्यापर्यंत पोहचलेच नसल्याचे सांगितले जात आहे. तेव्हा नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत आहे.या गोष्टींची करा चाचपणीआपल्या गावात कोणत्या कंपनीचे प्रतिनिधी पॅन कार्ड तयार करुन देण्यासाठी आले तर आधी त्यांच्याकडे अधिकृत कंपनी असल्याची कागदपत्रे, संबंधित कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता, ओळखपत्र या गोष्टींची चाचपणी करा. त्यानंतर अर्ज भरून द्या. सरपंच व सचिवांनी देखील या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.महत्त्वपूर्ण दस्तावेजसध्या कुठल्याही शासकीय कामांसाठी आधार व पॅनकार्ड महत्त्वाचे आहे. ही दोन कागदपत्रे असली की बँकेत खाते, सीम कार्ड तसेच इतर कामे देखील सहजपणे होतात. त्यामुळे हे दस्तावेज महत्त्वपूर्ण आहेत. यामुळे सुरक्षेचा देखील प्रश्न निर्माण होवू शकतो.