शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: April 16, 2016 01:17 IST

तिरोडा तालुक्यातील सर्वात नावाजलेली शेतकऱ्यांची धान्य विक्रीची कोठार कृषी उत्पन्न बाजार समितीत

सुविधांचा अभाव : विश्रामगृह नाममात्र, चौकशी खिडकी नाहीपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील सर्वात नावाजलेली शेतकऱ्यांची धान्य विक्रीची कोठार कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून याकडे प्रशासन व विभागाचे दुर्लक्ष जाणीवपूर्वक आहे.शेतकरी धान्य बाजार समितीत विक्रीसाठी येत असून आडतिया सकाळी माल विक्री करतो, व्यापारी धान खरेदी करतो व मालाची उचल व्यापारी करतो पण शेतकऱ्यांकडून उचल, मोलाईचे पैसे आडतीया मार्फत वसुल केले जातात. शेतक ऱ्यांचे माल विकावे व तोलाईचे ही पैसे द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांकडून दररोजचा लाखो रुपयांचा सेस जमा केला जातो, तो जातो कुठे असा प्रश्न शेतकरीवर्ग करीत आहे. शासनाचे अनुदान वेगळेच, बाजार समितीच्या हद्दीत असलेले दुकान गाळे यांचे भांडे अनामत रकमेचा अतापताच नाही. एका माजी संचालकाला विचारले असता त्यांनी, सगळ्यांना एक-एक गाळे देण्यात आले होते. कुणी विक्री केली काहीने भाड्याने दिले. सेसच्या पैशांचा हिसोब तर वेगळा सगळे चोर वाटून खाऊ अशी गत असून कोण बोलणार व सामान्य ग्रामीण शेतकऱ्याला काम घेणे देणे एक दिवस जाणे, माल विक्री करुन घरी येणे म्हणून कोणी शेतकरी लक्ष देत नाही असे सांगीतले. बाजार समिती बरखास्त झाली असून प्रशासक बसले पण तेही आडतीयाच आहेत. ते मौन धारण करुनच असतात. शेतकऱ्यांसाठी बाजार समितीत बसण्याची बैठकीसाठी जागा नाही, बरोबर शौचालय नसून सगळीकडे दुर्गंधी, घाण पसरली आहे. दर फलक नाही, अडत, सेस, इतर माहिती फलक, चौकशी खिडकी सुद्धा नाही. व्यापारी, आडतीया, प्रशासकाची साठगाठ असल्याने बाजार समितीत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली संचालक मंडळ बरखास्त झाले. मुख्य कार्यकारी अधीकारी ही निलंबित झाले. सर्व काही काम प्रभारी व प्रशासकाच्या रामभरोसे होत असून आहे. या शेतकऱ्यांच्या व्यथांकडे कोणी लोकप्रतिनिधी लक्ष देईल का व येणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी सहकारी सेवा सदस्य धडा शिकवणार का, अशा प्रश्न सामान्य शेतकरी करीत आहे. (वार्ताहर)