शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

देवरी-चिचगड राज्य मार्गाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 22:38 IST

देवरी-चिचगड हा राज्य मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देअपघाताच्या संख्येत वाढ : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी-चिचगड हा राज्य मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.देवरी सार्वजनिक बांधकाम उपविभागातंर्गत हा रस्ता येत असून रस्त्याचे डांबरीकरण योग्य न करण्यात आल्याने अल्पावधीतच या रस्त्याचे बारा वाजले आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वीच याच मार्गावरील खड्डयामुळे झालेल्या अपघातात एक वाहन चालक गंभीर जखमी झाला. तर ८ नोव्हेंबरला झालेल्या अपघातात धनराज किशन चनाप याचा मृत्यु झाला. कारु राऊत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.रस्त्यांवरील खड्डयांमुळे एका जणाला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. मात्र यानंतरही कुंभकर्णी झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना जाग आलेली नाही. यापुर्वी आमगाव-देवरी मार्गावरील खड्डयांमुळे एका पोलीस कर्मचाºयाचा मृत्यू झाला. तेव्हा कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवरी-चिचगड हा डांबरी मार्ग असून तो अल्पावधीत पूर्णपणे उखडल्याने बांधकामात वापरण्यात आलेल्या साहित्यावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे याच मार्गावरुच आमदार, खासदार, जि.प.चे बांधकाम सभापती व अन्य लोकप्रतिनिधी देखील ये-जा करतात. मात्र त्यांचे सुध्दा या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिंदीबिरी गावाजवळ पुलावर दहा पंधरा दिवसांपूर्वी अपघात होवून एकाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष व्याप्त आहे. चिचगड ते ककोडी रसत्यावरील बहुतांश पुलाची स्थिती बिकट आहे. तर चिचगड-ककोडी हा रस्ता तीन ते चार महिन्यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. या कामासाठी २ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र अल्पावधीत रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा