शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वरूणराजाच्या प्रसन्नतेसाठी 'मेंडूकराणी' दिंडी

By admin | Updated: July 23, 2015 01:43 IST

^‘मेंडूकरानी पाणी दे, धान कोदो पिकू दे’, ही आर्त हाक मारून बळीराजा आता मेघराजाला प्रसन्न करण्यासाठी धडपडत आहेत.

बळीराजाची आर्त हाक : सेंदुरवाफा ग्रामस्थांचा सहभागनितेश किरणापुरे लवारी^‘मेंडूकरानी पाणी दे, धान कोदो पिकू दे’, ही आर्त हाक मारून बळीराजा आता मेघराजाला प्रसन्न करण्यासाठी धडपडत आहेत. वरूणराजा प्रसन्न होऊन धरती मातेला चिंबचिंब भिजवून पिके नष्ट होण्यापासून वाचावे, यासाठी सेंदुरवाफा ग्रामस्थांनी श्रद्धेपोटी पौराणिक ‘मेंडूकराणी दिंडी’ च्या रूपाने वरूणराजाला केविलवाणी विनवणी केली. मागील काही दिवसापासून वरूणराजाने धरती मातेकडे पाठ फिरविली आहे. यामुळे शेतातील पिके करपू लागली असून रोवणी खोळंबली आहे. पावसाच्या आगमनासाठी बळीराजाच्या नजरा नभाकडे लागल्या आहेत. दिवसामागून दिवस निघत असल्याने हातचे पीक जाईल, या भितीने सेंदुरवाफावासीय वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी भक्तीभावात लीन झाले. या दिंडीत एका मुसळावर दोन्ही टोकाला दोन मेंडक (बेडूक) ठेवून त्यांची पुजाअर्चना करून त्याच्यासमोर समस्त ग्रामवासीयांनी मेघराजाला बरसण्याचे आवाहन केले आहे. जेव्हा जेव्हा दुष्काळ निर्माण केला, तेव्हा तेव्हा ग्रामस्थ मोठ्या आस्थेने मेंडूकराणीची दिंडी काढून वरूणराजाला प्रसन्न करण्याची ही पौराणिक परंपरा जपत असतात. या दिंडीसाठी सर्व ग्रामस्थ आपसातील हेवेदावे बाजूला सारून एकत्र येतात व मोठ्या भक्तिभावाने ही दिंडी यशस्वी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. गावावर आलेला दुष्काळ दूर व्हावा यासाठी एकोप्याने आराधना केल्याने वरूणराजाही त्यांच्यावर प्रसन्न झाला. ग्रामस्थांची आराधना संपताच पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे ऐतिहासिक मेंडूकराणी दिंडीचे आजही विशेष महत्व आहे. पावसाच्या आगमनाने चिंताग्रस्त असलेल्या बळीराजाचे चेहरे प्रफुल्लित झाले आहेत.