शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

योजना गरजूंच्या दारापर्यंत

By admin | Updated: August 17, 2015 01:41 IST

राजकारणाच्या सारीपाटातील विजयी सदस्यांनी आपसातील पक्षीय वैमनस्य बाजूला सारून समाजकारणासाठी अधिकाधिक वेळ द्यावा.

नावीन्यपूर्ण उपक्रम : शिवणयंत्र व विद्युत मोटारपंपाचे हस्तांतरणबोंडगावदेवी : राजकारणाच्या सारीपाटातील विजयी सदस्यांनी आपसातील पक्षीय वैमनस्य बाजूला सारून समाजकारणासाठी अधिकाधिक वेळ द्यावा. विकास कार्यात गटबाजी आड येणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना खऱ्या गरजूंच्या दारापर्यंत १०० टक्के कार्यान्वित करण्यासाठी अग्रक्रमाने प्राध्यान्य देणार, अशी ग्वाही अर्जनी-मोरगाव पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी दिली.पंचायत समितीच्या बचत भवनात तालुक्यातील आजी-माजी जि.प. पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन व सत्कार समारंभ पार पडले. याप्रसंगी योजना गरजूंच्या दारापर्यंत या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पं.स. सभापती अरविंद शिवणकर होते. अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष तसेच अर्थ व बांधकाम सभापती रचना गहाणे, पं.स. उपसभापती आशा झिलपे, माजी सभापती प्रकाश गहाणे, जि.प. सदस्य गिरीश पालिवाल, किशोर तरोणे, भास्कर आत्राम, मंदा कुंभरे, माजी जि.प. सदस्य मधू मरस्कोल्हे उपस्थित होते.सभापती शिवणकर पुढे म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी एकोप्याने सहकार्य करणे गरजेचे आहे. तालुक्यात भेडसावणाऱ्या विविध समस्या कायमच्या मार्गी लावण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचे कार्य तालुक्यातील जि.प. सदस्य व पदाधिकाऱ्यांनी करून विकास कार्यात हातभार लावावे, असे ते म्हणाले.या वेळी तालुक्यातील विद्यमान जि.प. पदाधिकारी रचना गहाणे, गिरीश पालिवाल, किशोर तरोणे, भास्कर आत्राम, मंदा कुंभरे तसेच माजी पदाधिकारी प्रकाश गहाणे, मधू मरस्कोल्हे, गोपीनाथ लंजे यांचा सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात गावची शाळा-आमची शाळा प्रकल्पांतर्गत प्रभागस्तरीय प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक व शाळा समितीच्या अध्यक्षांना रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच जि.प. समाज कल्याण विभागाच्या वतीने अनुदानावर विद्युत मोटार पंपांचे लाभार्थ्यांना तसेच जि.प. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने शिवणयंत्रांचे १२ महिला लाभार्थ्यांना हस्तांतरण सभापती शिवणकर, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, उपसभापती आशा झिलपे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी प्रकाश उरकुडे, संचालन सहायक गटविकास अधिकारी राजू वलथरे यांनी तर आभार मुलचंद राठोड यांनी मानले. कार्यक्रमात पं.स. सदस्य प्रेमलाल गेडाम, होमराज कोरेटील, नानाजी मेश्राम, जनार्दन काळसर्पे, रामलाल मुंगणकर, शिशुला हलमारे, नाजुका कुंभरे, करूणा नांदगाये, जयश्री पंधरे, अर्चना राऊत, टी.पी. कचरे, जगताप, नेताम, राजू वलथरे, चित्र ठेंगडी, कक्ष अधिकारी कापगते, पशुधन विभागाचे लुटे, बारापात्रे, बालविकास प्रकल्पाचे निशा आगाशे, कृषी विभागाचे रामटेके उपस्थित होते.(वार्ताहर)