शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन नादुरुस्त

By admin | Updated: July 22, 2016 02:41 IST

खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा मुख्य सीआय पाईप फुटल्याने १६ जुलैपासून २० गावांचा पाणी पुरवठा बंद आहे.

सीआय पाईप फुटला : तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद नवेगावबांध : खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा मुख्य सीआय पाईप फुटल्याने १६ जुलैपासून २० गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात या घटनेमुळे नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. सदर योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केली असून सन २०१० पासून खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळ जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनात चालवत आहे. सदर योजना नवेगाव जलाशयावर तयार केलेली आहे. या योजनेद्वारे नवेगाव, बोंडे, देवलगाव, पंचवटी, सुरगाव, चापटी, खांबी, बाराभाटी, ब्राम्हणटोला, कुंभीटोला, कवठा, डोंगरगाव, बोळदे, मुंगली, भुरसी, बीड, उमरी, सावरटोला, बोरटोला व मुंगलीटोली या वीस गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. १६ जुलैपासून खोली- बोंडे या गावाजवळ मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात विहिरी व बोअरवेलमध्ये पाणी गढूळ असते. त्यामुळे नळाचे शुद्ध पिण्याचे पाणी आवश्यक असते. पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना उपलब्ध असलेल्या पाण्यावरच गरज भागवावी लागत आहे. फुटलेली पाईपलाईन त्वरित दुरुस्त करुन पाणी पुरवठा नियमित सुरू करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग नवेगावबांध यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे कामात व्यत्यय येत आहे. तरी देखील मंडळाचे कर्मचारी रात्रंदिवस एक करुन येत्या चोवीस तासात पाणी पुरवठा सुरळीत सुरू करतील, अशी हमी खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाचे अध्यक्ष किशोर तरोणे यांनी दिली आहे. (वार्ताहर)