शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

थातूर-मातूर सफाईचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

सिव्हील लाईन्स कारा चौक परिसरातून सुरू होत असलेल्या या प्रभागात मनोहर चौक, प्रभात टॉकीज चौक, गांधी पुतळा, घाट रोड, ठाकूर मोहल्ला येतो. प्रभागात रस्त्यांचे जाळे दिसले. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून आला. सांडपाणी व गाळाने नाल्या बरबटलेल्या आढळल्या. यातून प्रभागात स्वच्छतेचा अभाव जाणविला तर काही नागरिकांनीही बोलून दाखविले.

ठळक मुद्देप्रभागात स्वच्छतेचा अभाव : रस्त्यांचे जाळे मात्र नाल्या बरबटलेल्याच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील काही भागासह बाजार भागाला लागून असलेल्या प्रभाग क्रमांक ७ चे क्रांती जायस्वाल व शिलू ठाकूर नगर परिषद सदस्य आहेत. सिव्हील लाईन्स कारा चौक परिसरातून सुरू होत असलेल्या या प्रभागात मनोहर चौक, प्रभात टॉकीज चौक, गांधी पुतळा, घाट रोड, ठाकूर मोहल्ला येतो. प्रभागात रस्त्यांचे जाळे दिसले. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून आला. सांडपाणी व गाळाने नाल्या बरबटलेल्या आढळल्या. यातून प्रभागात स्वच्छतेचा अभाव जाणविला तर काही नागरिकांनीही बोलून दाखविले.सिव्हील लाईन्स परिसरातील काका चौकातून प्रभागाची सुरूवात झाली असून पुढे मनोहर चौक परिसरात सांडपाणी व गाळाने बरबटलेल्या नाल्या दिसल्या. त्यांच्या शेजारी काढण्यात आलेले गाळ व कचऱ्याचे ढिगार दिसले.परिसरातील नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त करीत माणसं बोलावून सफाई करावी लागत असल्याचे सांगितले. मनोहर चौकात मोठा खड्डा तयार झाला असून पाणी साचलेले दिसले व त्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. पुढे मनोहर चौकातून प्रभात टॉकीज होत गांधी पुतळापर्यंत मुख्य मार्ग असून हा परिसर बाजार भागातच येतो.पुढे घाट रोड परिसरातील जगन्नाथ मंदिर व ठाकूर मोहल्लात जावून बघितले असता येथे नाल्यांमध्ये गवत उगवलेले दिसले. यातून या नाल्यांच्या सफाईचा प्रश्न पडला. विशेष म्हणजे, मान्सून बघताही या नाल्यांची सफाई झालेली नसल्याचे दिसले. परिसरातील नागरिकांनी नगरसेवक येतात असे सांगीतले. कचरागाडी दररोज कचरा संकलनासाठी येते असेही सांगीतले. मात्र झाडू लावणारे येत नसल्याचेही बोलून दाखविले. बाजार भागासह सिव्हील लाईन्स परिसरातील जुना रहिवासी भाग असल्याने येथे रस्ते व नाल्यांचे जाळे दिसले. मात्र स्वच्छतेचा अभाव ही जाणवला.नागरिकांनी व्यक्त केली नाराजीमनोहर चौक ते काका चौक परिसरातील काही नागरिकांनी बरबटलेल्या नाल्यांची स्थिती दाखवून स्वच्छतेची समस्या व्यक्त केली. एवढेच नव्हे तर माणसं बोलावून स्वत: सफाई करवून घ्यावी लागते असेही सांगीतले. यातून प्रभागातील स्वच्छतेचे चित्र दाखवून देत आपली नाराजी व्यक्त केली.प्रभागातील कचराकुंड्या तुडुंबप्रभागातील काही ठिकाणच्या कचराकुंड्या कचऱ्याने तुडुंब भरल्या असल्याचे दिसले. यातून या कचराकुंड्यातील कचऱ्याची उचल किती दिवसांपासून झालेली नाही असा प्रश्न पडला. पावसाळा असल्याने प्रभागात आता खऱ्या अर्थाने स्वच्छतेची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पाईप आहे पण नळ तुटलेलेजगन्नाथ मंदिरपासून काही अंतर पुढे पाण्यासाठी असलेले सार्वजनिक नळ दिसून आले. मात्र येथे पाईपलाईन दिसली. त्यावर लागलेले नळ तुटलेले दिसले. अशात या नळाला पाणी आल्यास पाण्याचा नासाडी होणार यात शंका नाही. मात्र या प्रकाराकडे नागरिक व नगरसेवक दोघांचेही दुर्लक्ष दिसून आले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान