शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

स्वदेशी खेळातून शारीरिक व बौद्धिक विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 23:48 IST

स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा वास असतो. विद्यार्थ्यांचे शरीर व मन स्वस्थ असणे हीच त्यांच्या यशस्वीतेची पायरी आहे. यामुळेच स्वदेशी खेळ व संस्कृतीला मंडळाकडून जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढे आणले जात आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुकास्तरीय स्वदेशी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा वास असतो. विद्यार्थ्यांचे शरीर व मन स्वस्थ असणे हीच त्यांच्या यशस्वीतेची पायरी आहे. यामुळेच स्वदेशी खेळ व संस्कृतीला मंडळाकडून जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढे आणले जात आहे. कारण स्वदेशी खेळ कमी खर्चाचे व मेहनती असून विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासोबतच शारीरिक व बौद्धिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम कारंजा येथे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्यावतीने बुधवारी (दि.९) आयोजित तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल उपस्थित होत्या. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ प्रत्येकच विद्यार्थ्याला त्याची योग्यता दाखविण्याची संधी देते. तेथेच पुरस्काराच्या माध्यमातून मंडळ उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना सन्मानीत करते. यातूनच अन्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून तेच भविष्यातील स्पर्धांसाठी त्यांना अधीक योग्यरित्या तयार करीत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला योगराज उपराडे, माधुरी हरिणखेडे, चमनलाल बिसेन, स्नेह गौतम, धनवंता उपराडे, महेंद्र शहारे, विजय बन्नाटे, प्रकाश रहमतकर, विमल नागपुरे, रजनी गौतम, विठोबा लिल्हारे, विजय लोणारे, कुंदन कटारे, खुशबू टेंभरे, भोजराज चुलपार, ओमप्रकाश भक्तवर्ती, इंद्रायणी कावळे, प्रिया बंसोड, प्रकाश डहाट, अखिलेश सेठ, जयप्रकाश बिसेन, किर्ती पटले, सुनिता दोनोडे, छाया दसरे, शामकला पाचे, कमलेश्वरी लिल्हारे, निता पटले, अनिल मते, विनिता टेंभरे, प्रमिला करचाल, प्रकाश देवाधारी, प्रकाश पटले यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.देशाच्या निर्मितीची दशा व दिशा तय करणारे शिक्षकचयाप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, स्वदेशी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी झटणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक केले. त्यांनी देशाच्या निर्मितीची दशा व दिशा तय करण्याचा दम ठेवणारे शिक्षकच असतात. ते ज्याप्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षित करतात, त्याचप्रकारे येणारा देश बनणार. यामुळे प्रत्येकच शिक्षकाने अत्यंत गंभीरता व पूर्ण निष्ठेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल