शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

पीएच.डी. पात्रता परीक्षेच्या वेळापत्रकाची चुकविली वेळ

By admin | Updated: September 18, 2016 00:34 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आगळा-वेगळा कारनामा समोर आलेला असून पि.एच.डी.च्या पात्रता परीक्षेच्या ओळखपत्रामध्ये देण्यात....

विद्यार्थ्यांच्या प्रसंगावधानाने झाली दुरुस्ती : नागपूर विद्यापीठाचा अफलातून कारभारपांढरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आगळा-वेगळा कारनामा समोर आलेला असून पि.एच.डी.च्या पात्रता परीक्षेच्या ओळखपत्रामध्ये देण्यात अलोल्या वेळेत पी.एम. ऐवजी ए.एम. दिल्याने विद्यार्थ्यांची फजिती झाली. तालुक्यातील निशांत हिरालाल राऊत नामक विद्यार्थ्याने प्रसंगावधान साधत वेळापत्रकामध्ये दुरुस्ती करुन घेतली अन्यथा विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला असता.सविस्तर वृत्त असे की, पीएचडीच्या पात्रता परीक्षेकरिता २०१६ चे अर्ज हे आॅनलाईन पद्धतीने एमकेसीएलच्या साईटवरुन आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भरण्यात आले. त्यामध्ये मोबाईल नंबरची सुद्धा नोंदणी करण्यात आली. त्यामुळे १९ आॅगस्टला निशांत राऊत या विद्यार्थ्याला एमकेसीएलच्या साईटवरुन ओळखपत्र डाऊनलोड करण्याचा मॅसेज आला. यावर निशांतने ओळखपज्ञ डाऊनलोड केले असता त्यामध्ये आॅनलाईन परीक्षेची वेळ ही ४.३० ए.एम. ते ६ ए.एम. ही होती. एकदम सकाळची वेळ पाहून विद्यार्थी आश्चर्यचकीत झाला. त्यामुळे ओळखपत्राच्या पानावरच विद्यापीठाचा लॅन्डलाईन नंबर असल्यामुळे विद्यार्थ्याने फोन लावला परंतु फोन कुणीही उचलला नाही. विद्यार्थ्याला वाटले की पीएचडीचा आॅनलाईन पेपर आहे आणि वेळापत्रकानुसार परीक्षा ही मात्र तीन म्हणजे १, २ आणि ३ सप्टेंबर या दिवसांमध्येच संपवायची अ सल्यामुळे कदाचित सकाळी साडेचार वाजता पेपरची वेळ असू शकते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यापीठाद्वारे ऐवढी मोठी चुक होऊच शकत नाही, अशा विद्यार्थ्याचा गैरसमज झाला.काही दिवस लोटल्यानंतर विद्यार्थ्याने काही अनुभवी प्राध्यापकांना या वेळे संदर्भात विचारले असता आगळे-वेगळे उत्तर मिळाल्याने विद्यार्थ्याच्या मनात वेळेसंदर्भात शंका- कुशंका निर्माण झाली. यावर त्याने नागपूर येथील मित्राशी संपर्क साधून विद्यापीठात जाण्याकरिता सांगितले. विद्यापीठात गेल्यानंतर मात्र हा प्रकार उघडकीस आला व वेळेमध्ये ४.३० पी.एम. ते ६ पी.एम. करण्यात आले. विशेष म्हणजे ओळखपत्र हाती आल्यानंतर निशांत राऊत या विद्यार्थ्याने पेपरला सकाळी उपस्थित राहण्याची शारीरिक व मानसिक तयारी केलेली होती. परंतु विद्यार्थ्यांच्या प्रसंगावधानाने ही बाब पेपरच्या पूर्वी दुरुस्त करण्यात आली. मात्र किती विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या या अफलातून कारभाराचे शिकार झाले याचा पत्ता नाही. (वार्ताहर)