शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:00 IST

आमगावच्या रिसामा येथील परवानाधारक देशी दारू दुकान कालांतराने पुन्हा सुरू झाली. यावेळी येथील महिलांनी दुकानावर हल्ला चढविला.

ठळक मुद्देकायदा सुव्यवस्थेचा प्रश्न : दारूबंदीसाठी महिला आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : आमगावच्या रिसामा येथील परवानाधारक देशी दारू दुकान कालांतराने पुन्हा सुरू झाली. यावेळी येथील महिलांनी दुकानावर हल्ला चढविला. दुकानावर तुफान दगडफेक केली व दुकान बंद पाण्यासाठी पुढाकार घेतला.रिसामा येथील दिनेश कटकवार यांची सरकार मान्यता देशी दारू विक्रीचे दुकान आहे. सदर दुकान लोकवस्तीत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हे दुकान लोकवस्ती बाहेर नेण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत. यासाठी महिलांनी अनेक आंदोलन केले. परंतु काही पुढाºयांनी याचे भांडवल केले. त्यामुळे हे देशी दारूचे दुकान दुसºया ठिकाणी स्थानांतरण झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश नंतर विविध राष्टÑीय व राज्यमार्गावरील दारू विक्रीचे व्यवसाय बंद पडले. यात न्यायालयाने नियम घातले. यात रिसामा येथील देशी दारू दुकान काही काळासाठी बंद करण्यात आली होती. परंतु सदर दुकान उघडण्यासाठी प्रशासनाने दुकान परवानाधारक यांना मंजूरी दिली. त्यामुळे प्रभागातील महिलांचा आक्रोश उफाळून आला.सदर दुकान उघडण्यासाठी २६ आॅगस्टला सकाळी ११ वाजता परवाना धारकाने द्वारे उघडले यावेळी रिसामा येतील महिलांनी एकत्रित येऊन दुकानावर जोरदार हल्ला चढवित दगडफेड केली. दुकानाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रिसामा येथे तणावाचे वातावरण आहे. यावेळी पोलीस प्रशासनाने तत्काळ दुकान बंद करून महिलांना बाहेर केले. यावेळी महिला दुकानावर जाण्यास मागे वळत नव्हत्या त्यामुळे तणाव वाढला होता.देशी दारू दुकान बंद करण्याची मागणी धरून महिलांनी पोलीस ठाणे गाठून पोलीस प्रशासनावर जोरदार शाब्दीक प्रहार केला. यावेळी पोलीस निरीक्षक दसूरकर यांच्याशी महिलांची बाचाबाची झाली. महिलांनी दारू दुकान नकोच असा हट्ट धरला. त्यामुळे पोलीस ठाण्यातही तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलीस निरीक्षक दसुरकर यांनी महिलांना कायदेशीर लढा देऊन दारुबंदीसाठी पुढाकार घ्यावे तर कायदा हातात न घेण्याचा सल्ला दिला. महिलांना दारूबंदीसाठी लढा सुरू राहणार असे सांगत महिला पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्या.भरवस्तीत देशी दारू दुकान नको म्हणून यासाठी लढणाºया महिला एकत्र आल्या. त्यांनी आक्रोश व्यक्त केला. त्यांना कायद्याने लढा असे सांगून ठाणेदार मोकळे होतात. महिलांनी गावातील कायदा सुव्यवस्था व शांतता भंग करण्यासाठी केलेला हा हल्ला असल्याचे दसुरकर म्हणाले. पोलीस प्रशासनावर दबाव आणता येणार नाही. कायदा राखण्यासाठी प्रतिबंधक कारवाई पुढे करू असे पोलीस निरीक्षक दासुरकर यांनी सांगितले.