शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे कत्तलीसाठी नेणाऱ्यांची पोलिसांवर दगडफेक

By admin | Updated: September 21, 2016 00:22 IST

ट्रकमध्ये जनावरे डांबून त्यांना कत्तलखान्यात नेणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर आरोपींनी दगडफेक केली

तीन पोलीस जखमी : पोलिसांनी केला लाठीचार्जगोंदिया : ट्रकमध्ये जनावरे डांबून त्यांना कत्तलखान्यात नेणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर आरोपींनी दगडफेक केली. ही घटना गोंदिया तालुक्याच्या चंगेरा येथे मंगळवारी पहाटे ३ वाजतादरम्यान घडली. पोलिसांनी आपल्या बचावासाठी लाठीचार्ज केला. या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले तर त्यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या. जनावरांना कत्तलखान्यात नेत असलेल्या १५ जनावरांना जप्त करण्यात आले. यात नऊ जणांना अटक करण्यात आले तर ६ लोक फरार आहेत.मध्यप्रदेशच्या बैल बाजारातून अवैधरित्या जनावरे खरेदी करून चंगेरा येथून शेकडो जनावरे २० सप्टेंबरच्या पहाटे कत्तलखान्यात जात होती. सात ट्रकमध्ये जनावरे डांबून नेत असताना याची माहिती गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांना मिळाली. रावणवाडी पोलिसांना सोबत घेऊन कारवाई करण्यासाठी ते गेले असता त्यांना पाहून सहा ट्रक पळवून नेण्यात आले. तक पोलीसांनी १२ म्हशींनी भरलेला एक ट्रक पकडला. यावेळी १५ जणांनी पोलिसांवर दगडफेक करीत हल्ला केला. यासंदर्भात पोलिसांनी १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चंगेरा येथून नेहमीच जनावरे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)जनावरांचा ट्रक पकडलागोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शालीमार हॉटेल समोर रिंगरोड येथे एमएच ३१/एपी १५९० या वाहनात १४ म्हशी डांबून कत्तलखान्यात नेत असताना रामनगर पोलिसांनी रविवारी रात्री ८.४० वाजतादरम्यान सदर ट्रक जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या ट्रकची किंमत १० लाख तर जनावरांची किंमत एक लाख २० हजार असा एकूण ११ लाख २० हजार रूपये सांगितले जाते. या प्रकरणात शारीख गफ्फूर शहा (२७,रा.नागपूर), सुनिल हौसलाल उके (१९,रा.चंगेरा), अमितभाई (रा.चंगेरा) व इतर दोन अशा पाच जणांवर प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा ११ (१) (ड)(ई) सहकलम ड (अ) (ब) ६,९, मोटार वाहन कायदा कलम १३० (३), १७७, १३२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महिलेवर प्राणघातक हल्लाजनावरे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती बाबू नावाचा इसम पोलिसांना देतो अशी शंका या जनावरांची तस्करी करणाऱ्या लोकांच्या मनात आल्याने त्यांनी आधी त्याच्या घरावर हल्ला चढविला. यावेळी बाबूच्या बचावासाठी आलेल्या त्याच्या आई नेहबीद्दीन यांच्या डोक्यावर रॉडने मारून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात हल्लेखोरांवर खूनाचा प्रयत्न म्हणून भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तीन पोलीस कर्मचारीगंभीर जखमीजनावरांची तस्करी करणाऱ्या आरोपींनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी माधव केंद्रे, संदीप बल्लारी व रावणवाडीचे माधव केंद्रे हे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी चंगेरा गावात चोख बंदोबस्त ठेवला होता.