शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

निविदांवरील याचिका केली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:06 IST

नगर परिषदेने काढलेल्या निविदेत विविध कामांमधील अटी-शर्तींना घेऊन टाकण्यात आलेली याचिका अखेर नागपूर उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यामुळे सुमारे २० कोटी रूपयांच्या या निविदांचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देन्यायालयाचे आदेश : सुमारे २० कोटींच्या कामांचे भूमीपूजन आज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेने काढलेल्या निविदेत विविध कामांमधील अटी-शर्तींना घेऊन टाकण्यात आलेली याचिका अखेर नागपूर उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यामुळे सुमारे २० कोटी रूपयांच्या या निविदांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर नगर परिषद प्रशासनाकडून सोमवारी (दि.१६) या विविध विकास कामांचे भूमीपूजन केले जात आहे.नगर परिषदेने विविध विकास कामांसाठी निविदा काढल्या होत्या. यासाठी ५० लाखांपेक्षा जास्त व ५० लाखांपेक्षा कमी अशा दोन भागांत निविदा काढल्या होत्या. यात ५० लाखांपेक्षा जास्त रकमेच्या कामांसाठी २ डिसेंबर २०१७ रोजी तर ५० लाखांपेक्षा कमीच्या कामांसाठी १८ डिसेंबर २०१७ रोजी निविदा काढण्यात आली होती व यासाठी निविदा टाकण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१७ ठेवण्यात आली होती. मात्र ही कामे काही निवडक कंत्राटदारांनाच मिळावी यासाठी काही अटी व शर्ती टाकून निविदांची तारीख वाढविण्यात आल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे होते व नगर परिषदेतील दोन कंत्राटदार न्यायालयात गेले होते.तेव्हा नगर परिषद प्रशासनाकडून निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नगर परिषदेने १ फेब्रुवारी रोजी पुन्हा निविदा काढली होती तर ३ फेब्रुवारी रोजी शुद्धीपत्रक काढले होते. या निविदांतही काही निवडक कंत्राटदारांना कामे मिळावी यासाठी अटी -शर्ती टाकण्यात आल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे होते. हे प्रकरण चांगलेच गाजत असताना अजयजीत मदनजीत वालीया यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने निविदा प्रक्रीया पूर्ण करा मात्र कार्यादेश देता येणार नाही असे आदेश दिले होते.या प्रकरणाला घेऊन ७ मार्च रोजी सुनावणीझाली असता न्यायालयाने नगर परिषदेने लावलेल्या अटी अवैध नाहीत असे सांगत याचिका रद्द करून प्रकरण निकाली लावले. त्यामुळे आता या निविदांचा मार्ग मोकळा झाला असून नगर परिषदेने लगेच सोमवारी (दि.१६) सुमारे २० कोटींच्या या विकास कामांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.पत्रिका ठरली चर्चेचा विषय२० कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन केले जात असताना नगर परिषदेने यासाठी पत्रिका प्रकाशित केली. ही पत्रिका व्हॉट्सअ‍ॅप व फेसबूकवर फिरत होती. विशेष म्हणजे, नगर परिषदेचा कारभार पूर्णपणे मराठी भाषेतूनच व्हावा असा नियम असतानाही भूमीपूजनाची ही पत्रिका मराठी व हिंदी अशा दोन भाषांत होती. पत्रिकेतील मजकूर मराठी भाषेत असतानाच शेवटी नगराध्यक्षांनी शहरवासीयांना आवाहन केले असून ते मात्र हिंदी भाषेत आहे. हिंदी भाषी शहरवासीयांना समजावे यासाठी हिंदीतून आवाहन करण्यात आल्याचेही काहिंनी सांगीतले. मात्र नियमांना बगल देत करण्यात आलेला प्रयोग चर्चेचा विषय ठरला.