शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे उठले नागरिकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:23 IST

जिल्ह्यातील कुठल्याही मार्गावरुन गेल्यास त्या रस्त्यांवर खड्डे नसतील तर नवलच म्हणावे लागेल. याच खड्ड्यांमुळे मागील पंधरा दिवसात चार जणांना जीव गमावावा लागला.

ठळक मुद्देनागरिक दाखल करणार जनहित याचिका : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कुठल्याही मार्गावरुन गेल्यास त्या रस्त्यांवर खड्डे नसतील तर नवलच म्हणावे लागेल. याच खड्ड्यांमुळे मागील पंधरा दिवसात चार जणांना जीव गमावावा लागला. मात्र यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही. परिणामी हे खड्डेच आता नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे.शहरातील रस्ते नव्हे तर आमगाव-देवरी, गोंदिया- देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी, गोंदिया-तिरोडा यासर्वच मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. डाबंरी रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने न बुजविल्याने त्यात पावसाचे पाणी साचून त्यांना आता गटारे स्वरुप आले आहे. यासर्वच मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र खड्डयांमुळे गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत खड्डयांमुळे चार जणांना नाहक जीव गमवावा लागला. तर पंधरा ते वीस जणांना गंभीर दुखापत झाली. खड्डयांमुळे रस्त्यांची चाळणी झाल्याचे चित्र असताना रस्त्यांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असणारा सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत आहे. नागरिकांची ओरड वाढल्यानंतर या विभागाने डांबरी रस्त्यांवरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्याचा प्रताप केला. मात्र त्यानंतर झालेल्या पावसाने खड्डयांमध्ये भरलेले मुरूम वाहून गेले. त्यामुळे खड्डे पुन्हा जैसे थे झाले. रस्त्यांवरील खड्डयांकडे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करित असल्याने आता नागरिकांनीच यासाठी पुढाकार घेतला आहे.गोंदिया येथील आठ ते दहा नागरिकांनी एकत्र येत रस्त्यांवरील खड्डयांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकारातंर्गत रस्त्यांवर आत्तापर्यंत करण्यात आलेला खर्च, रस्ते अपघातात किती बळी गेले, कितीदा रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली. याची माहिती मागविली आहे.बांधकाम विभागाचे हात वरजिल्ह्यातील मुख्य मार्गावरील रस्ते दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. नागरिकांनी जेव्हा या विभागाकडे रस्त्यांवरील खड्डयांची तक्रार केली. तेव्हा या विभागाच्या अधिकाºयांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत हातवर केले. विशेष म्हणजे या विभागातर्फे दरवर्षी रस्ते दुरूस्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र त्यानंतर रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने हे कोट्यवधी रुपये कोणाच्या घश्यात जातात.यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.अधिकाºयांना कंत्राटदारांची काळजीरस्त्यांवरील खड्डयांमुळे मागील पंधरा दिवसात चार जणांचा बळी गेला. मात्र यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डयांकडे लक्ष देण्याची गरज वाटली नाही. नागरिकांच्या हितापेक्षा त्यांना कंत्राटदारांच्या हिताची अधिक काळजी असल्याची ओरड आता नागरिक करित आहे.