शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या स्थायी सभेत इंदिराला मिळाले घरकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:04 IST

केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारने २०२२ पर्यंत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सर्वांना घरे देण्याचा संकल्प केला आहे. सडक-अर्जुनी तालुक्याच्या डोंगरगाव येथील इंदिरा यशवंत कोरे (५५) या निराधार महिलेची मागील पाच वर्षांपासून घरकुलासाठी पायपीट सुरू आहे, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले.

ठळक मुद्देपरशुरामकर यांचा पुढाकार : अखेरच्या स्थायी समितीवर भाजपचा बहिष्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारने २०२२ पर्यंत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सर्वांना घरे देण्याचा संकल्प केला आहे. सडक-अर्जुनी तालुक्याच्या डोंगरगाव येथील इंदिरा यशवंत कोरे (५५) या निराधार महिलेची मागील पाच वर्षांपासून घरकुलासाठी पायपीट सुरू आहे, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्ताला घेऊन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी स्थायी समितीच्या सभेत मुद्दा मांडला असता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र ठाकरे यांनी त्या महिलेला महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेतून घरकूल उभारून देण्याचे निर्देश संबंधित खंडविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.इंदिरा कोरे या घरकुलसाठी मागील पाच वर्षांपासून शासकीय कार्यालयाच्या पायºया झिजवित होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे दोन मुली आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर अहे. मोलमजुरी करुन त्यांनी दोन्ही मुलींचे लग्न केले. यानंतर त्या घरी एकट्याच राहत होत्या.पाच वर्षांपूर्वी त्यांचे राहते घर पडले. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले. आधीच मोलमजुरी करुन जीवन जगत असतानाच घर पडल्याने त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली. दारिद्रय रेषेखालील यादीतही त्यांचे नाव नसल्यामुळे त्यांना घरकूल कसा द्यावा ही देखील बाब प्रशासनापुढे होती. परिणामी घरकुलसाठी चकरा मारूनही इंदिरा कोरे यांना घरकुल मिळत नव्हते. ही बाब ‘लोकमत’ने बातमीच्या माध्यमातून पुढे आणली. ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या या वृत्ताला घेऊन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी शुक्रवारी (दि.२९) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा मुद्दा चांगलाच उचलून धरला व त्याचे फलीतही मिळाले.चर्चा बहिष्काराचीचजिल्हा परिषदेत काँग्रेस व भाजप अशी अभद्र युती आहे. या अभद्र युतीचे अडीच वर्ष पूर्ण होत असून जानेवारी महिन्यात नवीन पदाधिकाºयांची निवड होणार आहे. जून्या पदाधिकाऱ्यांची ही अखेरची स्थायी सभा शुक्रवारी जिल्हा परिषदेत घेण्यात आली. या सभेत बांधकाम विभागाच्या ३०५४ व ५०५४ या लेखाशिर्षातील बांधकाम सभापतींनी मंजूर केलेल्या कामांवर काहींचा आक्षेप असल्यामुळे ती कामे दुरूस्त करण्यासाठी अध्यक्षांनी या स्थायी समितीच्या सभेत पुन्हा विषय ठेवले होते. बांधकाम सभापतींनी मंजूर केलेल्या कामांना विरोध झाल्यामुळे त्या कामांची यादी दुरूस्त करून सभेत पुन्हा ठेवण्यात आल्याने बांधकाम सभापती रचना गहाणे, अल्ताफ पठाण, पशू संवर्धन सभापती छाया दसरे, रजनी कुंभरे या सभा सोडून सभागृहाबाहेर निघून गेल्या. समाज कल्याण सभापती देवराज वडगाये यांची या सभेला अनुपस्थिती होती. भाजपने या स्थायी समितीच्या सभेवर बहिष्कार टाकला अशीच चर्चा सभागृहात होती.