सडक-अर्जुनी : सतत चार दिवस बोअरवलेच्या खड्ड्यात राहून तिथेच शेवटचा श्वास घेणारा ३ वर्षीय विक्की दुर्दैवी ठरला. सर्वतोपरी प्रयत्नानंतरही त्याला वाचविण्यात यश आले नाही. तब्बल १०३ तासानंतर, म्हणजे रविवारच्या रात्री ११.३० च्या सुमारास बोअरवेलच्या खड्ड्यातून विक्कीला पुण्याच्या एनडीआरएफच्या पथकाने अलगद बाहेर काढले. पण त्याला जीवंत बाहेर काढू शकलो नसल्याची खंत या बचाव पथकाच्याही मनात दिसत होती.संपूर्ण जिल्ह्याचेच नाही तर राज्यभरातील जनतेचे लक्ष वेधणाऱ्या या घटनेत राका या छोट्याशा गावातील चांदेवार यांच्या शेतात खोदलेल्या बोअरवेलच्या खड्ड्यात ९ मार्च रोजी पडलेला विक्की अखेर मृत्युशी झुंज देत बोअरवेलमध्येच मरण पावला. विक्कीला कापडी छत्रीच्या सहाय्याने बोअरवेलमध्ये पकडून ठेवण्यात बचाव पथकाला यश आले असले तरी पाण्यात राहून मृतदेह फुगल्याने तो फसून वर खेचून काढणे अशक्य झाले होते. त्यामुळेच रात्रंदिवस एक करून बाजुला मोठा खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. पण दि.१३ च्या संध्याकाळी खाली दगड लागल्याने हे काम आणखी कठीण झाले होते. अखेर एनडीआरएफच्या टिमने रात्री ११ वाजता बोअरवेलच्या खड्ड्यातूनच विक्कीला बाहेर खेचण्यासाठी शेवटचे प्रयत्न करायला सुरूवात केली. काही वेळानंतर त्यात त्यांना यश आले. पिशवीसोबत विक्कीचा मृतदेहदेखील सोबत वर यायला लागला. लगेच विक्कीच्या आई-वडीलांना आणि घरच्या लोकांना घटनास्थळी बोलविण्यात आले. रात्री ११.२५ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. आई-वडीलांनी विक्कीला ओळखले. हेच शरीर विक्कीचे आहे, अशी ओळख पटताच रात्री १२ वाजता पोलीस विभागाकडून पंचनामा करण्यात आला. बाजूलाच शवविच्छेदनासाठी शेड उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी डॉक्टर हजर होते. रात्री २ ते २.३० वाजेपर्यंत प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यात आली आणि ३ वाजता विक्कीचे मृत शरीर त्याच्या आई-वडीलाच्या स्वाधिन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)सर्वाधिक काळ चाललेले आॅपरेशन४बोअरवेलच्या उघड्या खड्ड्यात मूल पडण्याच्या आणि त्याला जीवंत बाहेर काढण्याच्या घटना राज्यात आणि देशात अनेक घडल्या आहेत. मात्र सदर घटनेत विक्कीला वाचविण्यात यश आले नाही. त्यामागे तीन प्रमुख कारणे होती. एक म्हणजे सदर बोअरवेल अतिशय अरूंद होती. दुसरे म्हणजे ती तब्बल २७५ फूट खोल होती. तिसरे म्हणजे त्यात ७० फुटानंतर पाणी होती. त्यामुळे विक्कीला वाचविणे शक्य झाले नाही. विशेष म्हणजे दि.९ च्या सायंकाळी ४ पासून दि.१३ च्या रात्री ११ वाजेपर्यंत १०३ तास हे बचावकार्य अविरतपणे सुरू होते. इतका वेळ चाललेले हे काम राज्यातील पहिलेच असल्याचे सांगितले जाते.अन् पावसालाही आला गहीवर४विक्कीचे शवविच्छेदन तर आटोपले, पण त्याचवेळी पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे विक्कीच्या अंत्यविधीसाठी थोडे थांबावे लागले. पाऊस थांबल्यानंतर पहाटे ४ ते ४.३० वाजता राका गावाच्या स्मशानभूमित विक्कीचा दफनविधी करण्यात आला. ९ मार्चपासून सुरू झालेला विक्कीचा मृत्युशय्येवरील प्रवास अखेर १४ मार्चच्या सकाळी ८ ते ८.३० वाजता स्मशानभूमीत संपला. अधिकाऱ्याचे अविरत प्रयत्न४विक्की बोअरवेलच्या खड्ड्यात पडल्याचे माहित झाले त्या क्षणापासून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह संपूर्ण यंत्रणेने विक्कीला वाचविण्यासाठी आणि त्याला बोर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला तातडीने बोलविण्यापासून तर कामठीवरून आर्मीचे पथक, बालाघाट-भंडाऱ्याच्या खनिकर्म पथकासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.४दि.१३ च्या रात्रीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपजिल्हाधिकारी मोहीते, डीवायएसपी (तिरोडा) देविदास इलमकर, उपविभागीय अधिकारी (देवरी) सूर्यवंशी, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजकुमार केंद्रे, तहसीलदार व्ही.एम.परळीकर उपस्थित होते.मृतदेह बाहेर निघणार की नाही, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत होती. परंतु प्रशासनाने आपले प्रयत्न सतत सुरू ठेवले. अखेर विक्कीचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले. - व्ही.एम.परळीकर, तहसीलदार सडक-अर्जुनीविक्कीचा मृतदेह पांढरा पडला होता. परंतु त्याला जास्त जखमा झाल्या नव्हत्या. मृतदेह जास्त खराब झाला असावा अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. परंतु तसे काही घडले नाही. मृतदेहाची अवस्था चांगली होती. - राजकुमार केंद्रेठाणेदार, डुग्गीपार
१०३ तासांच्या प्रयत्नांना पूर्णविराम
By admin | Updated: March 15, 2016 03:33 IST