शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सखींनी सादर केला कलाविष्कार

By admin | Updated: July 21, 2015 01:19 IST

लोकमत सखी मंच सालेकसाच्या वतीने आयोजित खुल्या नृत्य स्पर्धेत महिला व सखींनी आपल्या कलागुणांना सादर

सालेकसा : लोकमत सखी मंच सालेकसाच्या वतीने आयोजित खुल्या नृत्य स्पर्धेत महिला व सखींनी आपल्या कलागुणांना सादर करीत उपस्थित प्रेक्षकांचे मन मोहून टाकले. प्रथमच लोकमत सखी मंचच्या या आयोजनात महिला व वृध्दांनीसुध्दा आपले कलाकौशल्य सादर केल्याने सालेकसावासीयांना नवल वाटल्याशिवाय राहिले नाही. येथील गायत्री मंदिर सभागृहात झालेल्या खुल्या नृत्य स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या दुर्गा तिराले होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती हिरालाल फाफनवाडे, जि.प. सदस्य लता दोनोडे, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, राकाँचे महासचिव बबलू कटरे, लोकमत प्रतिनिधी विजय मानकर, लोकमत समाचार संवाददाता गणेश भदाडे, सखी मंच संयोजिका पिंकी कापसे व इतर मान्यवर उपस्थित होते. एकल नृत्य आणि समूह नृत्य या दोन्ही स्पर्धेत सखींनी दिलखुलास मंचावर येवून आपली नृत्यकला सादर केली. त्याचबरोबर उद्बोधनपर नाटकेही सादर केली. आपल्या प्रास्ताविकात अर्चना गोल्लीवार यांनी महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या लोकमतच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.संचालन प्रिया मनोज शरणागत आणि गणेश भदाडे यांनी तर आभार विजय मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला गुरुकुल कंप्यूटर, कावडे प्रिंटीग प्रेस, धन्वंतरी क्लिनिकल लेबॉरटरी, तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल फुंडे, जिनीयस फोटो स्टुडिओचे निलेश बोहरे यांचे योगदान लाभले. रत्नकला शिंदे यांनी गुणदान करण्याचे काम केले. कार्यक्रमासाठी पिंकी कापसे यांच्या मार्गदर्शंनात किरण मोरे, सुलोचना कवरे, किर्ती कवरे, बबिता कापसे, सुुनिता मेंढे, सवाती रोकडे, सरिता मेश्राम, संतोषी मेश्राम, कंचन गोलेवार, वर्षा घरत, छाया कटरे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)विजेत्यांना मिळाली आकर्षक बक्षिसे४दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक किर्ती कावरे आणि द्वितीय क्रमांक राणी अग्रवाल यांनी पटकाविला. तसेच समूह नृत्य स्पर्धेत सुनिता शेंडे, पिंकी कापसे, सुलोचना, स्वाती, किरण यांच्या समुहाने प्रथम तर वर्षा घरत, विमल कटरे, विणा कटरे, कावेरी, अंतकला, संगीता यांच्या समुहाने द्वितीय क्रमांक पटकावला. पुरस्कार वितरण सोहळा दिनेश कवरे, महेश कावडे, डॉ. नागपुरे, अनिल फुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला.